iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही... लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?
लीक्सवर विश्वास ठेवला तर असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 प्रो मॅक्स भारतात सप्टेंबर 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. या ईव्हेंटमध्ये Apple त्यांचे दुसरे प्रिमियम डिव्हाईस देखील लाँच करू शकते. यामध्ये iPhone Fold चा देखील समावेश असणार आहे. लिक्समध्ये या आयफोन मॉडेलच्या किंमतीचा देखील खुलासा करण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 प्रो मॅक्सचे 256GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात 1,64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी आयफोनचे डिझाईन बदलले जाणार नाही. लीक्सनुसार आयफोन 18 प्रो मॅक्सचे डिझाईन काही प्रमाणात आयफोन 17 प्रो मॅक्सप्रमाणेच आहे. मात्र कंपनी यामध्ये नवीन रंग जोडण्याची शक्यता आहे. आगामी आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये देखील तेच प्रीमियम फिनिश, फ्लॅट एजेस आणि मजबूत बॉडी दिली जाण्याची शक्यता आहे.
आयफोन 18 प्रो मॅक्समधील कॅमेरा अपग्रेड केला जाणार आहे. लीक्सनुसार यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामधील तिन्ही सेंसर 48MP असणार आहेत. यामध्ये एक 48MP चा प्राइमरी कॅमेरा, एक 48MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि एक 48MP चा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. फ्रंट कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या आयफोनमध्ये 24MP चा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. कॅमेरा अपग्रेड कंटेट क्रिएटर्ससाठी खास ठरणार आहे.
PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस
आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये प्रोमोशन सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, स्क्रॉलिंग, गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्याा अनुभव अधिक स्मूद आणि प्रिमियम होणार आहे. कंपनी नेहमीच डिस्प्ले क्वालिटीवर लक्ष देते.
आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये Apple चा पुढील जेनरेशन A20 Pro चिपसेट दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रोसेसर केवळ वेगवानच नाही तर एआयशी संबंधित कामांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सक्षम मानला जातो.
Ans: Apple सहसा सप्टेंबर महिन्यात नवीन iPhone सिरीज लाँच करते. आगामी iPhone सुद्धा याच कालावधीत येण्याची शक्यता आहे.
Ans: होय, Apple कडून on-device AI, smart camera, AI photo editing, voice improvements असे फीचर्स येण्याची दाट शक्यता आहे.
Ans: होय. Apple ने USB-C स्वीकारल्यामुळे आगामी iPhone मध्ये USB-C चार्जिंग पोर्ट मिळेल.






