Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp वर येणार पेड सब्सक्रिप्शन! Meta One Plus आणि Premium प्लॅन्सची चर्चा सुरु; इतकी असू शकते किंमत

व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, फेसबुक वापरणाऱ्यांसाठी लवकरच मोठा बदल पाहायला मिळू शकतो. मेटा त्यांच्या मेटा वन सब्सक्रिप्शनअंतर्गत प्रीमियम फीचर्स देण्याची तयारी करत असून याचे संकेत व्हॉट्सॲपच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसून आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2026 | 12:29 PM
WhatsApp वर येणार पेड सब्सक्रिप्शन! Meta One Plus आणि Premium प्लॅन्सची चर्चा सुरु; इतकी असू शकते किंमत

WhatsApp वर येणार पेड सब्सक्रिप्शन! Meta One Plus आणि Premium प्लॅन्सची चर्चा सुरु; इतकी असू शकते किंमत

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये मेटा वन प्लस आणि मेटा वन प्रिमियम हे दोन नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन्स स्पॉट करण्यात आले आहेत.
  • एका सब्सक्रिप्शनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेटा एआई वरील प्रीमियम फीचर्स वापरण्याची सुविधा मिळू शकते.
  • मेटा वन प्लसची किंमत सुमारे ₹700 तर मेटा वन प्रिमियमची किंमत सुमारे ₹2,200 प्रतिमहिना असण्याची शक्यता आहे.
टेक कंपनी मेटाने अलीकडेच त्यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपसाठी सब्सक्रिप्शन प्लॅन्सची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या प्रीपेड प्लॅन्सची चाचणी मेटा वन अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये त्यांच्या अँड्रॉईड अ‍ॅपसाठी मेटा वनच्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सचा सपोर्ट पाहायला मिळणार आहे. यामुळे यूजर्सना एका सिंगल सब्सक्रिप्शनद्वारे मेटाच्या सर्व अ‍ॅप्सवर प्रिमियम फीचर्सचा वापर करता येणार आहे. कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित

मेटा वन सब्सक्रिप्शन प्लॅन्स

मेटा त्यांच्या मेटा वन सर्विस अंतर्गत दोन सब्सक्रिप्शन टियर्स सादर करू शकते. ज्यामध्ये मेटा वन प्लस आणि मेटा वन प्रिमियम यांचा समावेश असणार आहे. WABetaInfo द्वारे शोधण्यात आलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्म मेटा वन सब्सक्रिप्शन प्लॅन्स थेट अँड्रॉईड अ‍ॅपमध्ये जोडण्याची तयारी करत आहे. या फीचर ट्रॅकरने अँड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा वर्जन 2.26.23.10 वर दोन नवीन मेटा वन सब्सक्रिप्शन प्लॅन्स स्पॉट केले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

प्लॅन्स अ‍ॅक्सेस करण्याची आणि मॅनेज करण्याची सुविधा

रिपोर्टनुसार, यूजर्सना थेट व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे प्लॅन्स अ‍ॅक्सेस करण्याची आणि मॅनेज करण्याची सुविधा ऑफर केली जाणार आहे. जे यूजर्स कोणत्याही प्लॅनसाठी साइन-अप करतील, त्यांना पॅकेजचा भाग म्हणून व्हॉट्सॲप प्लसचे फायदे मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच यूजर्स एका सिंगल सब्सक्रिप्शनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, फेसबूक आणि मेटा एआयवर प्रिमियम फीचर्सचा वापर करू शकणार आहेत. WABetaInfo द्वारे काही स्क्रीनशॉट्स शेअर करण्यात आले आहेत.

मेटा वन प्लस आणि मेटा वन प्रिमियमची अपेक्षित किंमत आणि फायदे

मिळालेल्या माहितीनुसार, मेटा वनचे दोन प्लॅन्स लाँच केले जाणार आहेत, ज्यामध्ये मेटा वन प्लस आणि मेटा वन प्रिमियम यांचा समावेश असू शकतो. मेटा वन प्लसची किंमत 6.99 यूरो म्हणजेच सुमारे 700 रुपये प्रति महिना असू शकते. या प्लॅन्समध्ये ‘व्हॉट्सॲप प्लस’ फीचर्ससह अधिक चांगली ईमेज क्वालिटी आणि व्हिडिओ जनरेशन टूल्स मिळण्याची अपेक्षा आहे.

ChatGPT वापरताय? तुम्हालाही लागू शकतो लाखोंचा चुना… सर्च रिझल्टमध्ये दिसल्या बनावट शॉपिंग लिंक्स; असं राहा सुरक्षित

तसेच, मेटा वन प्रीमियमची किंमत सुमारे 20.99 यूरो म्हणजेच सुमारे 2,200 रुपये प्रति महिना असू शकते, असं सांगितलं जात आहे. या प्लॅनमध्ये मेटा वन प्लसच्या सर्व फीचर्सव्यतिरिक्त जास्त AI लिमिट, एडवांस्ड AI रीजनिंग, जास्त इमेज आणि व्हिडीओ जनरेशन सुविधा मिळण्याची शक्यता आहे. काही यूजर्सना एका महिन्याचे मोफत ट्रायल देखील दिले जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये असं देखील सांगितलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅप प्लसअंतर्गत यूजर्सना नवीन अ‍ॅप थीम्स, कस्टम रिंगटोन्स, अ‍ॅडिशनल पिन करण्यात आलेले चॅट्स, उत्तम लिस्ट कस्टमाइजेशन आणि प्रीमियम स्टिकर्स सारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, मेटा एआयचा अधिक प्रगत वापरही शक्य होऊ शकतो. ही माहिती सध्या लीक आणि बीटा वर्जनवर आधारित आहे. मेटाने अद्याप या प्लॅन्सची अधिकृत घोषणा केली नाही.

Web Title: Whatsapp may soon offer meta one plus and meta one premium subscriptions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • meta
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा…
1

30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा…

“काम बोरिंग होतं…” साॅफ्टवेअर इंजिनीयरने Meta ची हाय पेड नोकरी सोडली, आता गर्लफ्रेंडसोबत रस्त्यावर विकतोय नूडल्स; Video Viral
2

“काम बोरिंग होतं…” साॅफ्टवेअर इंजिनीयरने Meta ची हाय पेड नोकरी सोडली, आता गर्लफ्रेंडसोबत रस्त्यावर विकतोय नूडल्स; Video Viral

मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड
3

मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड

Meta Software Engineer Quits:’सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटाळवाणे…!’ टॅनच्या एका विधानाने सोशल मीडियावर खळबळ; नेमकं काय आहे कारण ?
4

Meta Software Engineer Quits:’सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटाळवाणे…!’ टॅनच्या एका विधानाने सोशल मीडियावर खळबळ; नेमकं काय आहे कारण ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.