ChatGPT वापरताय? तुम्हालाही लागू शकतो लाखोंचा चुना... सर्च रिझल्टमध्ये दिसल्या बनावट शॉपिंग लिंक्स; असं राहा सुरक्षित
अलीकडेच ब्रिटनमध्ये एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये चॅटजीपीटीमधील सर्च रिजल्ट्समध्ये काही फेक ‘शॉपिंग’ वेबसाइट्स दिसल्या. यामुळे अनेक यूजर्स स्कॅमचे शिकार बनले. स्कॅम-डिटेक्शन सर्विस ‘आस्क सिल्वर’ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी प्रसिद्ध रिटेल ब्रँड्सच्या खोट्या वेबसाईट्स तयार केल्या. जेव्हा यूजर्स चॅटजीपीटीकडून एखाद्या प्रोडक्टबाबत माहिती विचारायचे तेव्हा सर्च रिजल्टमध्ये या खोट्या वेबसाईट्स देखील दाखवल्या जात होत्या. (फोटो सौजन्य – Pinterest)
समजा, तुम्हाला एखाद्या ब्रँडची बॅग खरेदी करायची आहे आणि तुम्ही चॅटजीपीटीकडून सल्ला मागितला. आता चॅटीजीपीटी तुम्हाला अशा काही वेबसाईट्स दाखवेल, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅग्स दिसतील आणि या बॅग्स खरेदी करण्यासाठी लिंक देखील दिसेल. पण अशी दाट शक्यता आहे की, जर तुम्ही यामध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक केले तर तुमच्यासमोर एखादी खोटी वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट एखाद्या खऱ्या ब्रँडच्या वेबसाईटप्रमाणे दिसते, मोठ्या डिस्काऊंटचा दावा करते आणि ग्राहकांची पेमेंट आणि बँकिंग माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते.
एखादी वेबसाईट एआयने सुचवली आहे किंवा ती वेबसाईट एखाद्या लिस्टिंगमध्ये दिसत आहे, म्हणून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. यामुळे स्कॅम आणि फ्रॉडसारख्या घटना घडू शकतात. या खोट्या वेबसाईटची लिंक प्रसिद्ध एआय टूलमध्ये दिसण्याचे कारण असे आहे की, स्कॅमर्स इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात खोटा कंटेट आणि क्लोन वेबसाईट्स अपलोड करतात. याचा परिणाम असा होतो की, एआय मॉडेल्स चुकून या खोट्या आणि लोकांना भरकटवणाऱ्या सोर्सना खरे मानतात. या संपूर्ण प्रोसेसिंगला एआय पॉईजनिंग (AI Poisoning) म्हटलं जातं.






