Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp वर स्पॅम आणि स्कॅम कॉल्समुळे हैराण? फक्त करा ‘ही’ एक सेटिंग, जाणून घ्या प्रोसेस

WhatsApp Spam Call Feature: अनोळखी नंबरवरून येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळे त्रस्त असलेल्या युजर्ससाठी व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर उपलब्ध करून दिले आहे. अँड्रॉइड आणि आयफोन युजर्स हा फिचर्स कसा वापरु शकतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 28, 2026 | 07:57 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp वर स्पॅम आणि स्कॅम कॉल्समुळे हैराण?
  • फक्त करा ‘ही’ एक सेटिंग
  • जाणून घ्या प्रोसेस
आजकाल अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम आणि स्कॅम कॉल्स ही अनेक स्मार्टफोन युजर्ससाठी मोठी समस्या बनली आहे. विशेषतः व्हॉट्सॲपवरून येणारे फसवे कॉल्स अनेकांना मानसिक त्रास देत आहेत. याच समस्येवर उपाय म्हणून व्हॉट्सॲपने ‘सायलन्स अननोन कॉलर्स’ हे खास फीचर उपलब्ध करून दिले आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असून, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स आपोआप सायलेंट करण्याचे काम करते. सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार वेगाने वाढत असल्याने वापरकर्त्यांनी अशा सुरक्षा फीचर्सचा वापर करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. अनेकदा फसवे कॉल्सद्वारे वैयक्तिक माहिती किंवा बँकिंग डिटेल्स चोरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हे फीचर ऑनलाइन सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरते.

AI मुळे Tourism क्षेत्रात बदल! ‘या’ तीन कंपनीच्या भागीदारीमुळे होणार मोठा फायदा? प्रवास होणार सोप्पा

‘सायलन्स अननोन कॉलर्स’ फीचर कसे काम करते?

हे फीचर सुरू केल्यानंतर, तुमच्या फोनमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवरून जर व्हॉट्सॲप कॉल आला, तर फोन वाजणार नाही. त्यामुळे सतत येणाऱ्या स्पॅम किंवा स्कॅम कॉल्समुळे होणारा त्रास कमी होतो. विशेष म्हणजे, हे कॉल्स पूर्णपणे गायब होत नाहीत. व्हॉट्सॲप त्यांना कॉल्स टॅबमध्ये मिस्ड कॉल म्हणून दाखवते, त्यामुळे गरज असल्यास तुम्ही नंतर ते तपासू शकता.

अँड्रॉइड वापरकर्त्यांनी असे सुरू करा फीचर

अँड्रॉइड वापरकर्त्यांनी सर्वप्रथम व्हॉट्सॲप ॲप उघडा. त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर म्हणजेच डॉटवर क्लिक करून ‘सेटिंग्ज’मध्ये जा. पुढे ‘प्रायव्हसी’ पर्याय निवडून खाली स्क्रोल केल्यावर ‘कॉल्स’ हा पर्याय दिसेल. येथे ‘सायलन्स अननोन कॉलर्स’ हा पर्याय ऑन करा. यामुळे अनोळखी नंबरवरुन तुम्हाला फसवे कॉल्स येणार नाही.

iPhone वापरकर्त्यांसाठी प्रक्रिया

आयफोन वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲप उघडल्यानंतर स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ‘सेटिंग्ज’ टॅबवर जा. त्यानंतर ‘प्रायव्हसी’ पर्याय क्लिक करुन ‘कॉल्स’ पर्याय निवडा. येथे ‘सायलन्स अननोन कॉलर्स’ हे फीचर ऑन केल्यावर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स आपोआप सायलेंट होतील.

ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी महत्त्वाचे फीचर

आजकाल ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲपचे हे फीचर वापरकर्त्यांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरू शकते. काही सेकंदांत सुरू होणारे हे फीचर तुमचा वेळ, मानसिक त्रास आणि अनावश्यक कॉल्सपासून होणारा त्रास कमी करण्यास मदत करू शकते.

Instagram, Facebook अन् WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार; ‘META’ने सुरू केल्या सबस्क्रिप्शन-आधारित योजना!

Web Title: Whatsapp silence unknown callers feature spam scam call protection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp New Update
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.