Instagram, Facebook अन् WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार (Photo Credit- X)
मेटाने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी “Plus” सबस्क्रिप्शन प्लान सादर केले आहेत. कंपनीच्या मते, या प्लान्सच्या अंतर्गत युजर्सना असे काही खास फीचर्स मिळतील जे मोफत व्हर्जनमध्ये उपलब्ध नसतील. मेटाला आता केवळ जाहिरातींच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर अवलंबून राहायचे नाही, म्हणूनच कंपनीने सबस्क्रिप्शन मॉडेलच्या दिशेने हे मोठे पाऊल टाकले आहे.
कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी जाहीर केलेली किंमत खालीलप्रमाणे आहे:
टीप: सध्यातरी भारतासाठी अधिकृत स्थानिक किमतींची घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच भारतीय बाजारपेठेनुसार या किमती जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा आहे.
| प्लॅटफॉर्म | सबस्क्रिप्शन प्लान | अंदाजित किंमत (प्रतिमहिना) | प्रमुख फीचर्स |
| WhatsApp Plus | ~ 290 रुपये ($2.99) | कस्टम थीम, युनिक रिंगटोन, प्रीमियम स्टिकर्स, अधिक चॅट्स पिन करण्याची सुविधा. | |
| Instagram / Facebook | Instagram Plus / Facebook Plus | ~ 387 रुपये ($3.99) | स्टोरी री-व्ह्यू ट्रॅकर, अमर्यादित ऑडियन्स लिस्ट, गुप्तपणे स्टोरी प्रिव्ह्यू, स्पेशल फॉन्ट्स. |
| Meta AI | Meta One Plus | ~ 775 रुपये ($7.99) | एआय इमेज, व्हिडिओ जनरेशन आणि मोठ्या टास्कसाठी प्रगत क्षमता. |
| Meta AI (Premium) | Meta One Premium | ~ 1.393 रुपये ($19.99) | ‘मेटा वन प्लस’चे सर्व फीचर्स आणि वापरासाठी (Usage) अमर्यादित लिमिट. |
Sony 1000X The Collection: सोनीचे सर्वात प्रीमियम वायरलेस हेडफोन्स लॉन्च; काय आहेत वैशिष्ट्य
‘प्लस’ सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अनेक अतिरिक्त पर्याय मिळतील. युजर्स आता हे पाहू शकतील की त्यांची स्टोरी इतर युजर्सनी किती वेळा पुन्हा (Re-watch) पाहिली. याशिवाय, ‘अमर्यादित स्टोरी ऑडियन्स लिस्ट’ तयार करण्याचा पर्याय मिळेल आणि समोरच्या व्यक्तीच्या ‘व्ह्यूअर्स लिस्ट’मध्ये आपले नाव न येता गुप्तपणे स्टोरीचा प्रिव्ह्यू पाहता येईल. इन्स्टाग्राम प्लसमध्ये स्टोरी 24 तासांपेक्षा जास्त काळ दाखवण्याची सोय असेल, तसेच दर आठवड्याला एक स्टोरी ‘स्पॉटलाइट’ करून जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल.
मेटाने या प्लान्समध्ये अनेक कॉस्मेटिक अपग्रेड्स देखील समाविष्ट केले आहेत. इन्स्टाग्राम प्लस युजर्सना ॲनिमेटेड सुपर हार्ट रिॲक्शन्स (Animated Super Heart Reactions), कस्टम ॲप आयकॉन्स, बायोसाठी (Bio) विशेष फॉन्ट्स आणि प्रोफाईलमध्ये अधिक पोस्ट पिन करण्याची सुविधा मिळेल. यामुळे युजर्स आपली प्रोफाईल अधिक स्टायलिश बनवू शकतील.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, हे नवीन सबस्क्रिप्शन प्लान्स सध्या अस्तित्वात असलेल्या ‘मेटा व्हेरिफाइड’ पेक्षा पूर्णपणे वेगळे असतील. ‘मेटा व्हेरिफाइड’ प्रामुख्याने ओळख पडताळणी (ब्लू टिक) आणि ग्राहक सेवा देते, तर नवीन ‘प्लस’ प्लान्सचा मुख्य फोकस अतिरिक्त फीचर्स आणि युजर एक्सपिरियन्स सुधारण्यावर असेल.
मेटाने एआय (AI) युजर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि व्यावसायिक युजर्ससाठी Meta One Essential आणि Meta One Advanced प्लान्स लाँच केले आहेत.
BSNL ने आणला हटके प्लॅन; फक्त 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी अन् दररोज 2GB डेटा






