Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर

WhatsApp यूजर्ससाठी एक उपयुक्त फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे. स्टेटस पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमधील चुका सुधारण्यासाठी आता स्टेटस डिलीट करून पुन्हा अपलोड करण्याची गरज राहणार नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2026 | 11:25 AM
WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर

WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp स्टेटस शेअर केल्यानंतर कॅप्शन एडिट करण्याचे नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे.
  • यूजर्सना स्टेटस कॅप्शनमध्ये 15 मिनिटांच्या आत बदल करता येणार असून स्टेटस डिलीट करण्याची गरज भासणार नाही.
  • हे फीचर सध्या निवडक अँड्रॉईड बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध असून लवकरच सर्वांसाठी रोलआउट होण्याची शक्यता आहे.
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन आणि अनोखं फीचर घेऊन येणार आहे. या फीचरमध्ये यूजर्सना स्टेटस शेअर केल्यानंतर देखील कॅप्शन एडीट करण्याचा पर्याय मिळणार आहे. हे नवीन फीचर कॅप्शन एडिट या नावाने लाँच केले जाणार आहे. या फीचरमुळे आता स्पेलिंग चुकली किंवा कॅप्शन चुकले तरी देखील यूजर्सना स्टेटस डिलीट करण्याची किंवा रिपोस्ट करण्याची गरज भासणार नाही.

Oppo Reno 16 सिरीजला मिळणार K-Pop चा तडका; Baby Monster सोबत कंपनीने केली खास पार्टनरशिप, लवकरच येणार स्पेशल एडिशन

यूजर्स स्टेटस अपलोड केल्यानंतर देखील एडीट ऑप्शन ॲक्सेस करून कॅप्शन बदलू शकणार आहेत. हा बदल करण्यासाठी यूजर्सना स्टेटस अपलोड केल्यानंतर 15 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तसेच व्यूअर्सना समजणार देखील नाही की तुम्ही स्टेटसमध्ये काही बदल केला आहे. हे फीचर सध्या निवडक बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे आणि येत्या काही आठवड्यांत सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

व्हॉट्सॲपमध्ये कॅप्शन एडिटिंग फीचर

WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप अँड्रॉईडसाठी स्टेटस कॅप्शन एडिटिंग फीचर लाँच करण्याची तयारी करत आहे. हे फीचर अँड्रॉईड 2.26.30.1 अपडेटसाठी व्हॉट्सॲप बीटासह निवडक बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरमध्ये यूजर्सना फोटो किंवा व्हिडीओ डिलीट करण्याशिवाय स्पेलिंगमधील चुका दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. हे फीचर यूजर्ससाठी फायद्याचे ठरणार आहे. यूजर्स दोन प्रकारे याचा वापर करू शकतात आणि या अहवालात हे वैशिष्ट्य कसे कार्य करेल हे दर्शविणारा एक स्क्रीनशॉट समाविष्ट आहे.

एडीट कॅप्शन ऑप्शन

हे अपडेट कथितपणे यूजर्सना स्टेटसमधील कॅप्शन थेट एडीट करण्याची परवानगी देणार आहे. स्टेटस मेन्यूमध्ये एक नवीन एडीट कॅप्शन ऑप्शन दिसणार आहे. हे यूजर्सना स्टेटस अपडेट न उघडता बदल करण्याची सुविधा देते. याशिवाय, यूजर्स कॅप्शनच्या पुढे दिसणाऱ्या लहान पेन्सिल आयकॉनवर टॅप करून त्यांचे स्टेटस कॅप्शन बदलू शकतात. यूजर्सने कॅप्शन पोस्ट केल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत ते अपडेट केले जाऊ शकते. एकदा ती वेळमर्यादा संपली की, यूजर्स कॅप्शनमध्ये बदल करू शकत नाहीत.

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…

‘Edited’ लेबल दिसणार नाही

खरं तर, व्हॉट्सॲपमध्ये एडीट केलेल्या मेसेजवर ‘Edited’ लेबल दिसतो. मात्र रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, स्टेटस कॅप्शनमध्ये असे कोणतेही लेबल दिसणार नाही. स्टेटस कॅप्शन एडिट करण्याचे फीचर सध्या गूगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉइडसाठीची नवीनतम व्हॉट्सॲप बीटा आवृत्ती वापरणाऱ्या मर्यादित बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. येत्या काही आठवड्यांत व्हॉट्सॲप हे फीचर अधिक डिव्हाइसेसवर आणेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Whatsapp status caption edit feature in development users can modify captions after posting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला
1

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!
2

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!

गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium
3

गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
4

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.