Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस...
फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, फ्रीडम सेल सर्व ग्राहकांसाठी 8 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र फ्लिपकार्ट प्लस आणि फ्लिपकार्ट ब्लॅक मेंबर्सना या सेलचा ॲक्सेस 24 तासांपूर्वीच मिळणार आहे. म्हणजेच या मेंबर्ससाठी हा सेल 7 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. हा सेल किती दिवस सुरु राहणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. (फोटो सौजन्य: Pinterest)
असं सांगितलं जात आहे की, या सेलदरम्यान एसबीआय क्रेडीट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाऊ शकतं. ही ऑफर निवडक ईएमआय व्यवहारांवर देखील लागू केली जाणार आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय सारखे पर्याय देखील ग्राहकांना मिळणार आहेत. यामुळे प्रोडक्टची अंतिम किंमत आणखी कमी होणार आहे.
सेलपूर्वी फ्लिपकार्टने काही अशा प्रोडक्ट्सची झलक देखील दाखवली आहे, ज्यावर सेलदरम्यान खास ऑफर्स मिळू शकतात. यामध्ये आयफोन 17, सॅमसंग गॅलेक्सी एस 25 आणि मोटोरोला एज 70 फ्यूजन सारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. सेलमध्ये या डिव्हाईससेची किंमत किती असणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने खुलासा केला नाही. सेल सुरु होण्यापूर्वी कंपनी या प्रोडक्ट्सच्या किंमती जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
स्मार्टफोन्सव्यतिरिक्त फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ टॅब्लेट देखील स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त सॅमसंग 55-इंच 4के स्मार्ट टीव्ही आणि सॅमसंग गॅलेक्सी बुक 4 वरही डिस्काउंट उपलब्ध आहेत. कंपनीने असेही सूचित केले आहे की, सेल दरम्यान काही boAt इअरफोन्स 999 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतात.






