Oppo Reno 16 सिरीजला मिळणार K-Pop चा तडका; Baby Monster सोबत कंपनीने केली खास पार्टनरशिप, लवकरच येणार स्पेशल एडिशन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कंपनी भारतात लवकरच ओप्पो रेनो 16 सिरीज x बेबी मॉन्स्टर एडिशन लाँच करणार आहे. यासाठी साउथ कोरिया बेस्ड K-pop म्यूजिक ग्रुप बेबी मॉन्स्टरसोबत कोलॅब्रेशन केले जाणार आहे. याशिवाय स्पेशल एडिशनसाठी डेडिकेटेड माइक्रोसाइट्स आता देशात लाईव्ह झाली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, स्मार्टफोन्स भारतात ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: X)
ॲमेझॉनवर शेअर करण्यात आलेल्या माइक्रोसाइटनुसार, ओप्पो रेनो 16 सिरीज x बेबी मॉन्स्टर एडिशन एका थीमवाल्या रिटेल बॉक्ससह लाँच केला जाणार आहे. ज्यामध्ये एक स्मार्टफोन, एक थीम्ड प्रोटेक्टिव केस, ग्रुप मेंबर्सचे फोटो असलेले कार्ड्स आणि इतर एक्सेसरीज समाविष्ट असणार आहे. मायक्रोसाईटवरून असे समजते की, स्पेशल एडीशनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स स्टँडर्ड एडिशनसारखेच असणार आहेत. कंपनी यामध्ये कोणतेही डिझाईन बदलणार नाही.
कंपनीने 2 जुलै रोजी भारतात ओप्पो रेनो 16 लाँच केला होता. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिअंटची किंमत 61,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर हायर-एंड व्हेरिअंट असलेल्या 12GB + 256GB मॉडेलची किंमत 67,999 रुपये ठेवली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश ऑफर करतो आणि 460 पीपीआय पिक्सेल डेंसिटीसह 3,500 निट्सची पीक ब्राइटनेस ऑफर करतो.
भारतात लाँच करण्यात आलेला ओप्पो रेनो 16 क्वालकॉमच्या ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यासोबत 12GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. ओप्पो रेनो 16 मध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,700mAh बॅटरी दिली आहे.






