
30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा...
केस उघडताच होणार कनेक्ट! लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच… जाणून घ्या किंमत
आता आयफोन यूजर्सना, 30 नोव्हेंबरनंतर व्हॉट्सॲपचा वापर करण्यासाठी आयफोनवर नवीन आयओएस वर्जनची आवश्यकता असणार आहे आणि जुन्या आयओएस वर्जनवर आता व्हॉट्सॲप काम करणार नाही. त्यामुळे जर तुम्ही जुन्या आयफोनचा वापर करत असाल तर कंपनीने तुम्हाला डिव्हाईस अपडेट करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला आहे. यापूर्वी, कंपनीने iOS 15.1 पेक्षा जुन्या वर्जन्ससाठी व्हॉट्सॲप सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आयफोन 5s, आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस सोबतची त्यांची कंपॅटिबिलिटी संपली होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
सहसा नवीन फीचर्स आणण्यासाठी आणि सायबर क्राईमपासून सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी जास्त जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवरील व्हॉट्सॲप सपोर्ट बंद केला जातो. मात्र कंपनी यावेळी असं करणार नाही. सध्या जे डिव्हाईस iOS 15.1 वर्जनवर चालू आहेत, त्या सर्वांना iOS 15.5 वर्जनवर अपडेट केले जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे की, जुन्या आयफोन यूजर्सना व्हॉट्सॲपचा वापर सुरु ठेवण्यासाठी त्यांचा आयफोन बदलण्याची नाही केवळ अपडेट करण्याची आवश्यकता आहे.
आयफोन 5s, आयफोन 6, आयफोन 6 एस, आयफोन 6 एस प्लस, आयफोन SE (1st जेन), आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस वापरणाऱ्या यूजर्सवर कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम होणार आहे. जर यूजर्स या आयफोन मॉडेल्समध्ये जुन्या आयओएस वर्जनचा वापर करत असील तर त्यांना आयओएस 15.8.8 वर्जनवर अपडेट करावे लागणार आहे. या अपडेटनंतर यूजर्सना त्यांच्या आयफोनमध्ये व्हॉट्सॲपचा वापर करताना कोणतीही समस्या येणार नाही. पण हे काम लवकरात लवकर करावे लागणार आहे. कारण कंपनीने यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे.
इतर स्मार्टफोन्सप्रमाणेच आयफोन अपडेट करणं देखील अत्यंत सोपं आहे. जेव्हा आयफोनमध्ये नवीन अपडेट उपलब्ध असते, त्यावेळी आयफोन स्वत: याबाबत नोटिफिकेशन पाठवून यूजर्सना माहिती देतो. जर तुम्हाला मॅन्युअली आयफोन अपडेट करायचा असेल तर सेटिंगमध्ये जाऊन जनरल सेक्शन ओपन करा. यामध्ये सॉफ्टवेयर अपडेट पर्याय निवडा. आता तुमच्या स्क्रीनवर आयफोनसाठी उपलब्ध असलेले अपडेट दिसेल, ते इंस्टॉल करा. आयफोनमधील लेटेस्ट फीचर्सचा फायदा घेण्यासाठी आणि सायबर धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तज्ज्ञ सॉफ्टवेयर आणि अॅप्स नेहमी अपडेटेड ठेवण्याचा सल्ला देतात.