Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज… लवकरच येणार Blur Spoiler Tool

WhatsApp New Feature: तुम्हाला देखील सतत चिंता असते का, की सार्वजनिक ठिकाणी तुमच्या फोनवरील मेसेज एखादा अनोळखी व्यक्ती बघेल? तर आता तुमची ही चिंता लवकरच दूर होणार आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2026 | 02:56 PM
WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज... लवकरच येणार Blur Spoiler Tool

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज... लवकरच येणार Blur Spoiler Tool

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅपचे आगामी ब्लर स्पॉइलर मेसेज फीचर मेसेज ब्लर करून रिसीव्हरने टॅप केल्यानंतरच पूर्ण मजकूर दाखवेल.
  • हे फीचर सार्वजनिक ठिकाणी संवेदनशील किंवा वैयक्तिक संभाषण अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
  • स्पॉइलर मोड हा पर्याय बोल्ड, इटॅलिक आणि मोनोस्पेस सारख्या टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल्ससोबत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
WhatsApp Blur Spoiler Tool: यूजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा अधिक मजबूत व्हावी यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप सतत नवीन फीचर्स घेऊन असते. नुकताच असा रिपोर्ट समोर आला आहे की, टेक कंपनी मेटा काही नवीन सुरक्षा फीचर्सवर काम करत आहेत. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या यूजर्सची प्रायव्हसी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. अशी माहिती मिळाली आहे की, कंपनी व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक नवीन ब्लर स्पॉइलर मेसेज फीचर जारी करण्याचा विचार करत आहे. हे फीचर कसं काम करणार आणि याचा यूजर्सना कशा पद्धतीने फायदा होणार याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन स्पॉइलर मेसेज फीचर

मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपचे करोडो यूजर्स आहेत. याच करोडो यूजर्सची सुरक्षा टिकून राहावी यासाठी कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे. या नव्या फीचरचा उद्देश यूजर्सचे वैयक्तिक संभाषण आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या लोकांच्या नजरेपासून वाचवण्याचा आहे. लीक्सवर विश्वास ठेवला तर, कंपनी व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन फीचर स्पॉइलर मेसेज या नावाने सादर करू शकते. या फीचरच्या मदतीने यूजर्स एखादा मेसेज किंवा टेक्स्ट ब्लर करू शकतात. जेव्हा रिसीव्हर या मेसेजवर टॅप करेल तेव्हाच तो मेसेज दिसणार आहे.

जेव्हा तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसणारे मेसेज कोणी वाचू नये, तर अशा परिस्थितीत तुम्ही या फीचरचा वापर करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपवर स्पॉइलर मेसेज पाठवण्यासाठी फॉलो करा स्टेप्स

मिळालेल्या माहितीनुसार, हा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपच्या टेक्स्ट फॉर्मेटिंग टूल्ससह उपलब्ध केला जाणार आहे. याचा वापर करण्याची प्रोसेस अत्यंत सोपी असणार आहे. सर्वात आधी नेहमीप्रमाणे चॅट बॉक्समध्ये तुमचा मेसेज टाईप करा. आता या मेसेजवर दिर्घकाळ क्लिक करा आणि मेसेज सिलेक्ट करा. आता स्क्रीनवर कट, कॉपी आणि पेस्ट सारखे पर्याय दिसतील. याव्यतिरिक्त तीन डॉट देखील दिसतील. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या तीन डॉटवर टॅप करा.

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?

आता तुम्हाला स्क्रीनवर बोल्ड, इटॅलिक आणि मोनोस्पेस सारखे पर्याय दिसणार आहेत. यामध्येच तुम्हाला स्पॉइलर मोडचा पर्याय देखील दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा मेसेज ब्लर फॉर्मेटमध्ये बदलणार आहे. जेव्हा तुम्ही असा मेसेज पाठवता, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला अस्पष्ट दिसेल. मेसेज वाचण्यासाठी, त्यांना त्यावर टॅप करावे लागेल, त्यानंतरच संपूर्ण मजकूर दिसेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमुळे यूजर्सच्या प्रायव्हसीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. विशेषत: जेव्हा यूजर्सना सार्वजनिक ठिकाणी एखाद्या खाजगी विषयावर बोलायचे असेल अशावेळी हे फीचर फायद्याचे ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय?

    Ans: व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे, ज्याद्वारे मेसेज, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि कॉल्स करता येतात.

  • Que: व्हॉट्सअ‍ॅपची मालकी कोणाकडे आहे?

    Ans: Meta Platforms या कंपनीच्या मालकीचे व्हॉट्सअ‍ॅप आहे.

  • Que: व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे का?

    Ans: होय, व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी मोबाईल डेटा किंवा Wi-Fi इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते.

Web Title: Whatsapp will roll out new blur spoiler tool it will help to increase users privacy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.