Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का

Smartwatch Green Light: तुम्ही देखील स्मार्टवॉचचा वापर करता का? तुम्ही तुमच्या स्मार्टवॉचमध्ये हिरव्या रंगाची लाईट पाहिली आहे का? पण ही लाईट स्मार्टवॉचमध्ये का असते आणि फक्त हिरव्या रंगाचीच का असते, याबाबत सुमारे 90 टक्के यूजर्सना माहिती नसतं. हेच रहस्य आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 25, 2026 | 07:54 PM
Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का

Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टवॉचमधील हिरवा लाईट फोटोप्लेथिसमोग्राफी तंत्रज्ञानाच्या मदतीने हार्टबीट आणि पल्स मोजण्यासाठी वापरला जातो.
  • हिरवा प्रकाश रक्तातील बदल पटकन ओळखू शकतो, त्यामुळे स्मार्टवॉचला अचूक रीडिंग मिळते.
  • ब्लड ऑक्सिजन मोजण्यासाठी स्मार्टवॉचमध्ये हिरव्या ऐवजी लाल रंगाच्या लाईटचा वापर केला जातो.
Reason Behind Smartwatch Green Light : सध्याच्या काळात स्मार्टवॉच देखील स्मार्टफोनसारखे अनेक फीचर्स ऑफर करते. अगदी कॉलिंगपासून मेसेजिंगपर्यंत स्मार्टवॉचने ऑपरेट केले जाऊ शकते. त्यामुळे साामान्य घड्याळ खरेदी करण्यापेक्षा हल्ली सहसा लोकं स्मार्टवॉच खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही देखील स्मार्टवॉच यूजर असाल तर तुम्ही पाहिले असेल की जेव्हा तुम्ही स्मार्टवॉच मनगटावरून बाजूला काढता तेव्हा काही सेकंदांपर्यंत स्मार्टवॉचच्या मागे एक हिरव्या रंगांची लाईट चमकत असते.

अ‍ॅपलची महागडी स्मार्टवॉच असो नाही तर बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेले स्मार्टवॉच, प्रत्येकामध्ये ग्राीन लाईटचा वापर केला जातो. मात्र आता प्रश्न असा आहे की, बजेट फ्रेंडली स्मार्टवॉचपासून अगदी हजारो रुपयांच्या महागड्या स्मार्टवॉचमध्ये देखील ग्राीन लाईटचाच वापर का केला जातो? यामागे वैज्ञानिक कारण लपलेलं आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष

स्मार्टवॉच असे मोजते यूजरचे पल्स

याचं थेट उत्तर आहे की, ग्रीन लाईटच्या मदतीने पल्स डिटेक्ट करणं सोपं होतं. खरं तर यामागील विज्ञान अतिशय गुंतागुंतीचे आहे. पल्स मोजण्यासाठी स्मार्टवॉच फोटोप्लेथिसमोग्राफी प्रोसेसचा वापर करते. या तंत्रज्ञानामुळे समजते की, टिश्यू आणि त्वचेमधील रक्ताच्या प्रमाणात किती बदल झाला आहे. जेव्हा त्वचा आणि शरीरातील दुसऱ्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचते, हृदयाच्या ठोक्याबरोबर केशवाहिन्या प्रसरण पावतात आणि आकुंचन पावतात. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना स्मार्टवॉच त्वचेवर प्रकाश टाकते आणि किती प्रकाश परत परावर्तित होतो याची नोंद करते. ही संख्या नंतर स्क्रीनवर वाचता येण्याजोग्या स्वरूपात दर्शविली जाते. (फोटो सौजन्य – Pinterest)

ग्रीन लाईटचं काम नक्की आहे तरी काय?

रक्तामध्ये हीमोग्लोबिन असते, जे ऑक्सीजनच्या संपर्कात येताच लाल होते. हे जास्तीत जास्त लाईट शोषून घेते आणि विशिष्ट तरंगलांबीचा लाईट परावर्तित म्हणजेच रिफ्लेक्ट करते. कोणतेही लाल ऑब्जेक्ट हिरव्या रंगाची लाइट पूर्णपणे शोषून घेते. यामुळेच जेव्हा एखादी केशिका रक्ताने भरलेली असते, तेव्हा ती हिरवा प्रकाश पूर्णपणे शोषून घेते. यामुळे स्मार्टवॉचला नोंद ठेवणं सोपं जात की, केशिका केव्हा रक्ताने भरलेली आहे आणि केव्हा रिकामी आहे. याशिवाय, हिरव्या रंगांची लाईट त्वचेमध्ये तितकी खोलवर जाऊ शकत नाही, जितक्या इतर रंगांच्या लाईट जाऊ शकतात. त्यामुळे, स्मार्टवॉच शरीराच्या पृष्ठभागावरूनच रीडिंग घेते आणि अचूक मोजमापाची नोंद ठेवते.

Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे

इतर रंगांच्या प्रकाशाचा कसा होतो वापर?

स्मार्टवॉचमध्ये केवळ हिरव्या रंगाची लाईटच वापरली जाते, असे नाही. हिरव्या रंगासोबतच कंपनी इतर मोजमाप करण्यासाठी वेगळ्या रंगाच्या लाईटचा वापर करते. ब्लड ऑक्सीजन मोजण्यासाठी स्मार्टवॉच लाल रंगांच्या लाईटचा वापर करते. हे मोजमाप पूर्णपणे वेगळ्या प्रोसेसवर आधारित असते. त्यामुळे यामध्ये हिरव्या रंगाच्या लाईटचा वापर होत नाही.

Web Title: Why smartwatches use green light what is the reason behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • smartwatch
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

China Tech: चिनी स्मार्टवॉच आता शत्रूच्या पाणबुड्या शोधणार; धुळीच्या कणाएवढ्या चिपमुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाची वाढली चिंता
1

China Tech: चिनी स्मार्टवॉच आता शत्रूच्या पाणबुड्या शोधणार; धुळीच्या कणाएवढ्या चिपमुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाची वाढली चिंता

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सने यूजर्स त्रस्त! अवघ्या ६ महिन्यांत २० लाखांहून अधिक तक्रारी दाखल
3

अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सने यूजर्स त्रस्त! अवघ्या ६ महिन्यांत २० लाखांहून अधिक तक्रारी दाखल

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?
4

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.