
भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?
भारतात शाओमी, वनप्लस, विवो, ओप्पो, अॅपल, रिअलमी, नथिंग, अशा अनेक ब्रँड्सचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. हे ब्रँड्स गेल्या अनेक वर्षांपासून युजर्सच्या मनावर राज्य करत आहेत. भारतातील स्मार्टफोन बाजारात या स्मार्टफोन्सचा मोठा हिस्सा आहे. हे स्मार्टफोन्स ब्रँड्स युजर्सच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्मार्टफोन लाँच करत असतात. मात्र आता या ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी एक नवीन स्मार्टफोन ब्रँड सज्ज झाला आहे. भारतीय बाजारात लवकरच एका नवीन स्मार्टफोन ब्रँडची एंट्री होणार आहे. हा नवीन स्मार्टफोन ब्रँड भारतातील स्मार्टफोन युजर्सना कशा पद्धतीने इंप्रेस करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या काही दिवसांतच नव्या स्मार्टफोन ब्रँडची भारतात एंट्री होणार आहे. या नव्या स्मार्टफोन ब्रँडचं नाव Wobble असं आहे.
Wobble ने घोषणा केली आहे की, पुढील महिन्यात हा स्मार्टफोन ब्रँड भारतातील बाजारात एंट्री करणार आहे. हा कंज्यूमर टेक ब्रँड भारतात लवकरच त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. Wobble हा बंगळुरु बेस्ड Indkal Technologies चा इन-हाउस ब्रँड आहे. हा इन-हाउस ब्रँड सध्या भारतात डिस्प्ले आणि स्मार्ट टीवी रेंज ऑफर करतो. कंपनीने सध्या अपकमिंग स्मार्टफोनचे नाव किंवा त्याच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही मााहिती शेअर केली नाही. मात्र अलीकडेच जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, नव्या स्मार्टफोन ब्रँडचे पहिले डिव्हाईस MediaTek Dimensity 7400 5G चिपसेटने सुसज्ज असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Wobble smartphone will be powered by MediaTek’s Dimensity 7400 SoC. pic.twitter.com/FBxRZ5CfPs — Abhishek Yadav (@yabhishekhd) September 12, 2025
Wobble त्यांचा पहिला स्मार्टफोन भारतात 19 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचे लाँचिंग नवी दिल्लीत केले जाणार आहे. याबाबत कंपनीने अधिकृतपणे घोषणा देखील केली आहे. Indkal Technologies च्या मालकीचा हा ब्रँड सध्या भारतात डिस्प्ले आणि स्मार्ट टीव्ही ऑफर करतो. अपकमिंग Wobble स्मार्टफोनच्या नावाबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच कंपनीने या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स देखील अधिकृतपणे जाहिर केलेले नाहीत.
Wobble ने फोनच्या साइड प्रोफाइलची एक टीजर इमेज शेअर केली आहे, ज्यामध्ये या डिव्हाईसची स्लिम डिझाईन पाहायला मिळत आहे. फोनमध्ये फ्लॅट फ्रेम आणि स्लिम बॉडी प्रोफाईल पाहायला मिळत आहे. फोनमध्ये रियरमध्ये एक मोठा कॅमेरा मॉड्यूल देखील पाहायला मिळत आहे. पावर आणि वॉल्यूम बटन फ्रेमसह फ्लॅश डिझाइन देखील आहे.
Wobble स्मार्टफोनबाबत सप्टेंबर महिन्यापासून चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोनला IMEI डेटाबेस आणि Geekbench वेबसाइटवर मॉडेल नंबर WB25SPMTA15P2 सह स्पॉट करण्यात आले आहे. या लिस्टिंग्समधून फोनचा चिपसेट आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर्जन उघड झाले आहे. हा अपकमिंग हँडसेट Wobble 1 नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमध्ये MediaTek Dimensity 7400 5G चिपसेट दिला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, हा फोन 8GB रॅमसह येईल आणि Android 15 वर चालेल.