Smartphone Leaks: Xiaomi 16 बाबत समोर आली नवीन अपडेट, डिस्प्ले आणि बॅटरीचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक
चीनी टेक्नोलॉजी कंपनी Xiaomi चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 16 या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन नक्की कधी लाँच केला जाणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच सोशल मीडियावर या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लिक झाले आहेत. ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की आगामी स्मार्टफोन कसा असेल.
एक टिप्स्टरने आता Xiaomi 16 च्या डिस्प्ले आणि बॅटरीची माहिती दिली आहे. Xiaomi 16 स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा नेक्स्ट जेनरेशन Snapdragon 8 Elite 2 चिप दिला जाऊ शकतो. या चिपसह लाँच होणारा हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनने सांगितलं आहे की, अपकमिंग Xiaomi 16 मध्ये ‘6.3X’ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. असा अंदाज लावला जाऊ शकतो की, स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.31 इंचपासून 6.9 इंचाच्या मध्ये असणार आहे. एका लिकमध्ये सांगितलं आहे की, Xiaomi 16 या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच स्क्रीन दिली जाऊ शकते. Xiaomi 16 चा डिस्प्ले Xiaomi 15 पेक्षा मोठा असणार नाही. पण टिप्स्टरने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी यामध्ये मोठी बॅटरी दिसी जाऊ शकतो. डिजिटल चॅट स्टेशनने शेअर केलेल्या पोस्टनुसार, Xiaomi 16 मध्ये 7,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
ही बॅटरी कंपनीच्या लेटेस्ट फ्लॅगशिपच्या 5,240mAh बॅटरीपेक्षा मोठी आहे. एप्रिलमध्ये एका दुसऱ्या लीकमध्ये म्हटलं होतं की, फोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. आगामी स्मार्टफोनची बॉडी जुन्या मॉडेल्सप्रमाणे असेल की लेटेस्ट मॉडेल्सप्रमाणे पातळ असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. Xiaomi 16 सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. हा स्नॅपड्रॅगन 8 एलिट 2 प्रोसेसरसह येणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक असल्याचे मानले जाते. क्वालकॉम देखील त्याच वेळी त्यांच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपच्या उत्तराधिकारीचे अनावरण करण्याची अपेक्षा आहे.
Xiaomi 16 मध्ये सध्याच्या Xiaomi 15 फ्लॅगशिपपेक्षा काही अपग्रेड्स मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 6.36-इंच OLED स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिप, 50-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप, 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 5,240mAh बॅटरी यांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात किंवा महिन्यांत फोनची अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.