Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

Xiaomi 17 Max Launched: नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? शाओमी दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह एक नवीन स्मार्टफोन घेऊन आला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 68,000 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनमध्ये 6.9-इंच1.5K (1,200×2,608 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2026 | 03:28 PM
8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • Xiaomi 17 Max मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.9-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळतो.
  • डिव्हाईसमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8000mAh बॅटरी आणि 200MP Leica-ट्यून्ड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Xiaomi Smartphone Launched: टेक दिग्गज कंपनी शाओमीने चीनमध्ये फ्लॅगशिप Xiaomi 17 लाइनअपमधील नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Xiaomi 17 Max या नावाने लाँच केला आहे. कंपनीने ईव्हेंटदरम्यान लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. शाओमी 17 मॅक्समध्ये शाओमी 17 सिरीजमधील सर्वात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच केला आहे.

BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा

शाओमी 17 मॅक्सची किंमत आणि उपलब्धता

शाओमी 17 मॅक्स स्मार्टफोन कंपनीने 12GB + 256GB, 16GB+256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,799 म्हणजेच सुमारे 68,000 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,099 म्हणजेच सुमारे 72,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,399 म्हणजेच सुमारे 76,000 रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल असलेल्या 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,799 म्हणजेच सुमारे 82,000 रुपये आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 25 मे पासून शाओमी ऑनलाईन स्टोअरवर या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन पिक्सल ब्लॅक, स्काय ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Xiaomi) 

शाओमी 17 मॅक्सचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नवा स्मार्टफोन एक डुअल सिम हँडसेट आहे, जो शाओमीच्या अँड्रॉईड 16-बेस्ड HyperOS 3 वर चालतो. या फोनमध्ये 6.9-इंच1.5K (1,200×2,608 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 300Hz टच सँपलिंग रेट, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, 3,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, HDR10+ सपोर्ट, एचडीआर व्हिव्हिड, डॉल्बी व्हिजन आणि ड्रॅगन क्रिस्टल 3.0 प्रोटेक्शन दिले आहे. कंपनीने दावा केला आहे की, या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट दिला आहे, जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 4.6GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. या फोनमध्ये अ‍ॅड्रेनो जीपीयू, क्वालकॉम एआय इंजिन, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील दिले आहे. सुरक्षेसाठी नव्या फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे.

कॅमेरा

फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, शाओमी 17 मॅक्समध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिले आहे, ज्यामध्ये सॅमसंग HP9 सेंसर, 23mm फोकल लेंथ आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 200-मेगापिक्सेल (f/1.65) चा प्राइमरी शूटर दिला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.4) चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील आहे, जो 3x पर्यंत ऑप्टिकल झूम ऑफर करतो. यासोबतच फोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.4) चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील दिला आहे, जो 102-डिग्रीचा फील्ड ऑफ व्यू देतो. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तो 4K/30 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.

Lenovo चं गेमर्सना खास सरप्राईज! 2K गेमिंग डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच… किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

बॅटरी

नव्या डिव्हाईसमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, क्यूजेडएसएस आणि NavIC चा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, IR ब्लास्टर, कलर टेम्परेचर सेंसर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, ई-कम्पास आणि बैरोमीटर सारखे सेंसर देण्यात आले आहेत.

Web Title: Xiaomi 17 max launched with 8000mah battery starting price is 68000 rupees read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
2

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
4

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.