BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा
बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नव्या रिचार्ज प्लॅनची म्हणजेच फ्रीडम ऑफरची घोषणा केली आहे. यामध्ये यूजर्सना केवळ 51 रुपयांत तब्बल 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे मिळणार आहेत. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना नवीन सिम पूर्णपणे मोफत मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
New connection. Smart savings. Stronger network. Get started with the BSNL Freedom Offer at just ₹51/- and enjoy: * Daily 2GB Data/ Day
* 100 SMS/ Day
* FREE BSNL SIM
* 28 Days Validity
* Unlimited Calling Because every smart start deserves a reliable connection. Available… pic.twitter.com/hnQFQbNUrB — BSNL India (@BSNLCorporate) May 22, 2026
एक्स पोस्ट शेअर करत कंपनीने म्हटलं आहे की, नवीन कनेक्शन, स्मार्ट बचत, अधिक मजबूत नेटवर्क. फक्त 51 रुपयांमध्ये बीएसएनएल फ्रीडम ऑफरचा लाभ घ्या आणि मिळवा: दररोज 2GB डेटा, दररोज 100 एसएमएस, मोफत बीएसएनएल सिम, 28 दिवसांची व्हॅलिडीटी, अमर्याद कॉलिंग. कारण प्रत्येक स्मार्ट सुरुवातीसाठी एक विश्वसनीय कनेक्शन आवश्यक आहे. तुमच्या जवळच्या बीएसएनएल CSC आणि रिटेलर स्टोअर्समध्ये उपलब्ध. ऑफर 30 जून 2026 पर्यंत वैध.
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इतर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, यूजर्सना यामध्ये डेली 2GB डेटा आणि 100 फ्री एसएमएसची सुविधा मिळणार आहे. ही प्रीपेड प्लॅन रिचार्ज ऑफर 22 मेपासून 30 जून 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. नवीन यूजर्सना जोडण्यासाठी कंपनीने ही ऑफर सादर केली आहे. यापूर्वी देखील कंपनीने नवीन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी 1 रुपयांची फ्रीडम ऑफर सादर केली होती. ज्यामध्ये नवीन यूजर्सना केवळ 1 रुपयात 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात होती. यामध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि नॅशनल रोमिंगचा फायदा मिळत होता. याशिवाय फ्रीडम ऑफरअंतर्गत 1 रुपयांत नवीन सिम खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसची सुविधा देखील मिळत होती.






