Lenovo चं गेमर्सना खास सरप्राईज! 2K गेमिंग डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच... किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची प्री ऑर्डर सुरु करण्यात आली आहे. या डिव्हाईसची विक्री 9 जूनपासून सुरु होणार आहे. कंपनीने 4 स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्यामध्ये 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB यांचा समावेश आहे. 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 2599 युआन म्हणजेच सुमारे 36,895 रुपये आहे. 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3199 युआन म्हणजेच सुमारे 45,410 रुपये आहे. 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3599 युआन म्हणजेच सुमारे 51,090 रुपये आहे. 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत 4399 युआन म्हणजेच सुमारे 62,455 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.82-इंच 2K अमोलेड एलटीपीओ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईस 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 7000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि HDR10+, डीसी डिमींग, डॉल्बी विजनने सुसज्ज आहे. डिव्हाईसमध्ये अॅड्रेनो 829 जीपीयूसह ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 3nm प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाईस 12GB / 16GB एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा 9600Mbps रॅमसह 256GB/512GB/1TB यूएफएस 4.1 स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 1/1.56″ सोनी LYT-710 सेंसर, f/1.88 अपर्चर, ओआयएससह 50MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये f/2.2 अपर्चर आणि मॅक्रो ऑप्शनसह 8MP ऑटोफोकस अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.
लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8000mAh बॅटरी दिली आहे.






