50MP फ्रंट कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीसह Xiaomi चा नवीन हँडसेट लाँच, असे आहेत स्पेशल फीचर्स
तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. लोकप्रिय टेक कंपनी Xiaomi ने त्यांचा नवीन प्रिमियम स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने Xiaomi 15S Pro सह Civi 5 Pro लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट मॉडेलमध्ये Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर आणि 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. याशिवाय या हँडसेटची डिझाईन देखील अतिशय आकर्षक आहे. त्यामुळे स्मार्टफोन हातात घेताच आपल्याला एक क्लासी लूक मिळतो. Civi 5 Pro चे स्पेशल एडिशन कॉफी-कलर्ड व्हेरिअंट बॅक पॅनलमध्ये कॉफी ग्राउंड्ससह उपलब्ध आहे.
Xiaomi Civi 5 Pro स्मार्टफोन चीनमध्ये तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 35,700 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 39,300 रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,599 म्हणजेच सुमारे 42,800 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, चेरी ब्लॉसम पिंक, आइस्ड अमेरिकानो, नेबुला पर्पल आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Xiaomi Civi 5 Pro मध्ये 6.55-इंच 1.5K (1,236×2,750 पिक्सेल) स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट, 3,200 निट्स पीक ब्राइटनेस, 2,160Hz PWM डिमिंग रेट, HDR10+ आणि Dolby Vision सपोर्ट आहे.
माइक्रो-कर्व्ड OLED डिस्प्लेमध्ये 1.6mm यूनिफॉर्म, नॅरो बेजल्स आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन आहे. फोन 4nm ऑक्टा-कोर Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज सपोर्ट आहे. हा फोन Android 15-बेस्ड HyperOS 2.0 स्किनवर चालतो.
फोटोग्राफीसाठी Xiaomi Civi 5 Pro मध्ये Leica-बॅक्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. यामध्ये 50-मेगापिक्सल 1/1.55-इंच Light Fusion 800 प्रायमरी सेंसर आहे, ज्यामध्ये f/1.63 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सपोर्ट आहे. कॅमेरा यूनिटमध्ये 50-मेगापिक्सल टेलीफोटो शूटर आणि 12-मेगापिक्सल सेंसरसह अल्ट्रावाइड-अँगलने देखील सुसज्ज आहे. हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. ज्यामध्ये f/2.0 अपर्चर आणि ऑटो-फोकस सपोर्ट आहे.
Xiaomi Civi 5 Pro मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 67W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे.
स्मार्टफोन 5G, डुअल 4G VoLTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Beidou, Galileo, GLONASS, GPS, NavIC, NFC आणि USB Type-C कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. यामध्ये IR सेंसर, Dolby Atmos सपोर्टसह स्टीरियो स्पीकर्स आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.