Refer करा आणि पैसे कमवा! Instagram घेऊन येतोय धमाकेदार ऑफर, तुम्हालाही मिळणार जिंकण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रिल्स आणि पोस्ट शेअर करून पैसे कमावता येतात. याशिवाय इन्फ्लूएंसर्स ब्रँड प्रमोशन करून देखील अधिक पैसे कमावतात. पण आता इंस्टाग्रामवर एक नवीन ऑफर सुरु करण्यात आली आहे. म्हणजेच आता इंस्टाग्राम युजर्सच्या कमाईचा एक नवीन मार्ग बनला आहे. तुम्ही देखील सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असता आणि लोकांना इन्फ्लुएंस करण्यात तुमचा दांडगा अनुभव असेल तर ही ऑफर खास तुमच्यासाठी असू शकते. तुमचे नेटवर्क चांगले असेल, तर इंस्टाग्रामचा नवीन रेफरल प्रोग्राम तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकतो. तुम्ही या प्रोग्रामच्या मदतीने पैसे कमावू शकणार आहात.
Instagram ने एक खास रेफरल स्कीम लाँच केली आहे. या स्कीमअंतर्गत काही निवडक यूजर्सना त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा इतर ओळखीच्या व्यक्तिंना इंस्टाग्रामवर जोडण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. जर तुम्ही शेअर केलेल्या लिंकने एखाद्या नवीन युजरने इंस्टाग्राम जॉईन केलं तर तुम्हाला त्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. तुम्ही शेअर केलेल्या लिंकने कोणी अॅप डाऊनलोड केलं किंवा कोणत्या सर्विसचा वापर केला तर यामध्ये तुमचा फायदा होणार आहे. यामध्ये तुम्हाला 20,000 डॉलर म्हणजेच सुमारे 16 लाख रुपयांपर्यंत पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Instagram तुमच्यासाठी एक खास रेफरल लिंक तयार करणार आहे. ही लिंक तुम्ही WhatsApp ग्रुप, Facebook, इंस्टा स्टोरीज
किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकणार आहात. तुम्ही शेअर केलेल्या लिंकवरून कोणती
अॅप डाउनलोड, साइनअप, शॉपिंग किंवा इतर काही केलं तर यासाठी इंस्टाग्राम तुम्हाला पैसे देणार आहे.