Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टायलिश केस आणि मॉडर्न लूक… Xiaomi च्या नव्या ईयरबड्सवर यूजर्स झाले फिदा, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम अनुभव

Xiaomi Clip Launched: म्युझिक लव्हर्ससाठी मोठी खुशखबर! भन्नाट फीचर्स असलेले शाओमीचे नवे ईयरबड्स मार्केटमध्ये धडकले आहेत. याची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. तसेच यामध्ये एआय फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामुळे यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2026 | 12:36 PM
स्टायलिश केस आणि मॉडर्न लूक... Xiaomi च्या नव्या ईयरबड्सवर यूजर्स झाले फिदा, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम अनुभव

स्टायलिश केस आणि मॉडर्न लूक... Xiaomi च्या नव्या ईयरबड्सवर यूजर्स झाले फिदा, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम अनुभव

Follow Us
Follow Us:
  • Xiaomi Clip ईयरबड्समध्ये AI ट्रान्सलेशन, लाईव्ह ट्रान्सक्रिप्शन आणि बोन-कंडक्शन माइकसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत.
  • या ओपन-ईयर वायरलेस ईयरबड्समध्ये 11mm डायनामिक ड्रायव्हर आणि Hi-Res Audio Wireless सपोर्ट मिळतो.
  • Xiaomi Clip मध्ये फास्ट चार्जिंग, Bluetooth 5.4, IP57 रेटिंग आणि ड्युअल-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट आहे.
Xiaomi Earbuds Launched: अलीकडेच चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका ईव्हेंटदरम्यान टेक कंपनी शाओमीने Xiaomi 17 Max आणि Xiaomi Smart Band 10 Pro सह Xiaomi Clip ओपन-ईयर वायरलेस ईयरबड्स देखील लाँच केले आहेत. अनेक पावरफुल फीचर्सने सुसज्ज असलेल्या या ईयरबड्सची सुरुवातीची किंमत 12,000 रुपये ठेवण्यात आली आहे. नव्या ईयरबड्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सविस्तर जाणून घेऊया.

Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर

Xiaomi Clip ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने CNY 849 म्हणजेच सुमारे 12,000 रुपयांच्या किंमतीत नवीन ईअरबड्स लाँच केले आहे. ग्राहक सुरुवातीच्या विक्रीदरम्यान हे डिव्हाईस CNY 799 म्हणजेच सुमारे 11,300 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. लेटेस्ट लाँच ईयरबड्स ऑब्सिडियन ब्लॅक, पॅरेट पर्पल, पर्ल व्हाइट आणि सॅटिन गोल्ड (चीनी भाषेतून अनुवादित) कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, नवीन ईअरबड्स आता चीनमध्ये शाओमी वेबसाईट, ऑथराइज्ड रिटेल आउटलेट्स आणि मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X)

Xiaomi Clip चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या या वियरेबलमध्ये 11mm चे डायनामिक ड्राइवर यूनिट आहे, ज्यामध्ये माइक्रोक्रिस्टलाइन मेटल-कोटेड डायफ्रामचा वापर करण्यात आला आहे. 20Hz ते 48kHz च्या फ्रीक्वेंसी रिस्पॉन्स रेंज ऑडिओ ऑफर करण्यासाठी हे ईअरबड्स डिझाईन करण्यात आले आहेत. हे ईयरबड्स कम्पॅटिबल डिव्हाईसवर LHDC 5.0 सह हाय-रेजोल्यूशन ऑडियो डिकोडिंगला सपोर्ट करतात आणि त्यांना हाय-रेस ऑडिओ वायरलेस सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.

कॉलिंगसाठी शाओमीने क्लिप ईयरबड्समध्ये तीन-माइक्रोफोन अ‍ॅरेसह एक VPU बोन-कंडक्शन माइक्रोफोन देखील दिला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ही सिस्टिम मानवी आवाज आजूबाजूच्या गोंधळापासून वेगळा करते आणि गोंधळ – गर्दीच्या ठिकाणी कॉलवरील आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. शाओमीने एक डायरेक्शनल अकूस्टिक स्ट्रक्चर देखील स्विकारले आहे, जे कॉल्स आणि मीडिया प्लेबॅक दरम्यान ऑडिओ लीकेज कमी करण्यासाठी आणि प्रायव्हसी सुधारण्यासाठी रिवर्स साउंड लहरींचा वापर करते. शाओमी क्लिप हे XiaoAI द्वारे अखंड व्हॉइस संभाषणास समर्थन देते आणि बातम्या, हवामानाची माहिती देऊ शकते, तसेच दैनंदिन प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. या ईयरबड्समध्ये एक XiaoAI कम्पेनियन मोड देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे संभाषण अधिक नैसर्गिक आणि संदर्भानुसार होते.

शाओमीने शाओमी ईअरबड्स अ‍ॅपमध्ये अनेक एआय AI-पावर्ड प्रोडक्टिविटी टूल्स जोडले आहेत, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर आणि व्हिडीओ प्लेबॅकसाठी लाइव इंटरप्रिटेशन, रियल-टाइम कॉल ट्रांसलेशन, फेस-टू-फेस कन्वर्सेशन ट्रांसलेशन, ऑन-डिवाइस वॉयस रिकॉर्डिंग, ऑडियो आणि कॉल रिकॉर्डिंग सपोर्ट, रियल-टाइम ट्रांसक्रिप्शन आणि AI-जेनरेटेड समरी समाविष्ट आहे. यूजर्स थेट चार्जिंग केसद्वारे देखील रेकॉर्डिंग सुरु किंवा बंद करू शकतात.

Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस

शाओमी क्लिप इअरबड्स ॲपलच्या इकोसिस्टमशी सुसंगत आहेत आणि चार्जिंग केस शोधण्यासाठी ॲपलच्या फाईंड माय ॲपला सपोर्ट करतात. शाओमी क्लिपच्या कनेक्टिविटी फीचर्समध्ये ब्लूटूथ 5.4, एएसी, एसबीसी आणि एलएचडीसी 5.0 कोडेक्स समाविष्ट आहे. शाओमीने डुअल-डिवाइस स्मार्ट कनेक्टिविटी देखील समाविष्ट केली आहे, ज्यामुळे ईयरबड्स एकाचवेळी दोन डिव्हाईससोबत कनेक्ट केले जाऊ शकतात. ईयरबड्स जेस्चर कंट्रोल्सला देखील सपोर्ट करतात. यूजर्स ऑडियो सुरु करण्यासाठी किंवा थांबण्यासाठी डबल-टॅप करू शकतात आणि ट्रॅक बदलण्यासाठी ट्रिपल-टॅप करू शकतात. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी यामध्ये IP57 रेटिंग दिली आहे. शाओमी क्लिपमधील प्रत्येक ईअरबडमध्ये 60mAh बॅटरी दिली आहे आणि चार्जिंग केसमध्ये 510mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. ईयरबड्स फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

Web Title: Xiaomi clip new earbuds launched in china with stylish case and modern look read price and features and tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
2

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
3

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.