Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर
ज्याप्रमाणे स्टूडिओमध्ये व्हिडीओ बनवताना अँकर टेलीप्रॉम्प्टरची मदत घेतो, ज्यामुळे स्क्रिप्ट बोलताना काही चूक होऊ नये. त्याच पद्धतीने आता इंस्टाग्राममध्ये देखील रिल्स बनवताना यूजर्सना अॅपमध्ये इन-बिल्ट टेलीप्रॉम्प्टरचा पर्याय मिळणार आहे. ज्यामुळे स्क्रिप्टसाठी क्रिएटर्सना एक वेगळा टेलीप्रॉम्प्टर वापरण्याची गरज भासणार नाही. यूजर्स इंस्टाग्राम अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन टेलीप्रॉम्प्टर फीचर चालू करू शकतात. पण यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने अलीकडेच यूजर्ससाठी इंस्टंट्स फीचर रोलआऊट केले आहे. स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी कंपनीने हे नवीन फीचर सादर केले आहे. यामध्ये यूजर्सना इंस्टंट्स शेअर करण्याचा पर्याय मिळतो, जे 24 तासांपर्यंत उपलब्ध असतात. एखाद्या यूजरने शेअर केलेले इंस्टंट्स दुसरा यूजर केवळ एकदाच पाहू शकतो. इंस्टंट्सचा स्क्रीनशॉट काढला जाऊ शकत नाही आणि गॅलरीमध्ये देखील सेव्ह करू शकत नाही. तसेच यामध्ये यूजर्स केवळ लाईव्ह फोटो पाठवू शकतात, ज्यामध्ये कोणत्याही फील्टरचा वापर होत नाही.






