Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस
OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती
कंपनीने घोषणा केली की, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये आपल्या व्यापक विस्तार धोरणाचा भाग म्हणून मालदा, हल्दिया आणि बहरामपुरमध्ये 5G सर्विस सुरु केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, 5G सर्विसचा विस्तार लवकरच दुर्गापुर, आसनसोल, हाबरा-अशोकनगर, बर्धमान, खडगपुर, गंगटोक आणि दार्जिलिंगपर्यंत केला जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 5G सर्विस आता 3 शहरांमध्ये सुरु करण्यात आली असून उर्वरित 7 शहरांमध्ये जून महिन्यापर्यंत ही सेवा सुरु केली जाऊ शकते. यामुळे राज्यातील लाखो यूजर्सना हाय-स्पीड इंटरनेट आणि अधिक चांगल्या नेटवर्कचा अनुभव मिळणार आहे. गेल्यावर्षी कंपनीने कोलकाता आणि सिलीगुडीमध्ये त्यांची 5G सर्विस सुरु केली होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vi त्यांचे नेटवर्क अधिक मजबूत व्हावे यासाठी सतत प्रयत्न करत आहे. तसेच देशातील छोट्या शहरांपर्यंत पोहोचून तेथील यूजर्सना चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात 5G सर्विसची मागणी वेगाने वाढत आहे. स्मार्टफोन यूजर्सना सुपरफास्ट इंटरनेटची आवश्यकता आहे. अशातच Vi वेगाने त्यांच्या 5G सर्विसचा विस्तार करत आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Vi ची 5G सेवा सध्या पश्चिम बंगालमधील मालदा, हल्दिया आणि बहरामपुर शहरांमध्ये लाईव्ह झाली आहे. या शहरांमधील Vi यूजर्सना आता वेगवान डाउनलोड स्पीड, अधिक चांगली व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि कमी लेटेंसीचा फायदा मिळणार आहे. Vi चं असं म्हणण आहे की, या शहरांमधील नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर अपग्रेड केले जात आहे, ज्यामुळे यूजर्सना अधिक चांगल्या कनेक्टिविटीचा अनुभव मिळू शकेल.
आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी… HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये
5G नेटवर्कच्या विस्तारामुळे यूजर्सना वेगवान इंटरनेट स्पीड, अधिक चांगली व्हिडीओ कॉलिंग, हाय-क्वालिटी ऑनलाइन गेमिंग आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हिडीओ स्ट्रीमिंग सारख्या सुविधांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, डिजिटल सेवा आणि स्मार्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्यासाठी देखील प्रेरणा मिळणार आहे. Vi च्या विस्तारामुळे हे दिसून येते की 5G आता केवळ मोठ्या महानगरांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते प्रादेशिक आणि विकसनशील शहरांपर्यंतही पोहोचत आहे. यामुळे भविष्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.






