Xiaomi चा नवा सब-ब्रँड Mijia भारतात लाँच! स्वस्तात मिळणार ॲडव्हांस स्मार्ट होम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स
Mijia शाओमीचे होम आणि लाइफस्टाईल ब्रँड आहे. या ब्रँडचे प्रोडक्ट्स आता भारतीय बाजारात देखील उपलब्ध असणार आहेत. Mijia हे शाओमीचे चौथे ब्रँड आहे, जे कंपनीने भारतीय बाजारात लाँच केले आहे. यापूर्वी कंपनीने शाओमी, रेडमी आणि पोको ब्रँड मार्केटमध्ये सादर केले आहेत. ही घोषणा शाओमीच्या शाओमी के ह्युमन × कार × होम स्ट्रेटजीचा एक भाग आहे, याला कंपनीने 2023 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये सादर केले होते. (फोटो सौजन्य: X)
कंपनीने भारतीय बाजारात यापूर्वीच स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्ट टिव्ही आणि AIoT प्रोडक्ट्सद्वारे इकोसिस्टम तयार केली आहे. यानंतर आता कंपनीचा फोकस होम अप्लायंसेज मार्केटमध्ये असणार आहे. शाओमीचं असं म्हणणं आहे की, Mijia ब्रँडअंतर्गत कनेक्टेड एक्सपीरियंस अधिक सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांचे प्रोडक्ट शाओमी हायपरओएसद्वारे समर्थित स्मार्ट डिव्हाईससोबत जोडली जातील.
Mijia ब्रँडच्या लाँचिंगनंतर, शाओमी अशी योजना आखत आहे की, ते होम प्रोडक्ट कॅटेगरीअंतर्गत मोठ्या उपकरणांचा विभाग भारतीय बाजारपेठेत सादर करतील. कंपनीने पुष्टी केली आहे की, भविष्यात होम एंड लाइफस्टाईल प्रोडक्ट, लार्ज अप्लायंसेज प्रोडक्ट देखील सादर केले जाणार आहेत.
शाओमी 2014 साली भारतीय बाजारात दाखल झाले होते. कंपनीने स्मार्टफोनने सुरुवात केली होती, त्यानंतर स्मार्ट टिव्ही, टॅब्लेट, वीयरेबल्स आणि AIoT डिव्हाईसेस देखील लाँच करण्यात आले. इतकंच नाही तर शाओमीने एयर कंडीशनर आणि एयर प्यूरीफायर सारखे होम अप्लायंसेज देखील लाँच केले आहेत. कंपनी येत्या काही दिवसांत आगामी Mijia उत्पादनांविषयी माहिती देईल.






