Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडियन मार्केटमध्ये लाँच झाला POCO चा लेटेस्ट स्मार्टफोन, हटके फीचर्स आणि किंमत तुमच्या बजेटमध्ये

POCO C71 Launched: POCO ने आज 4 एप्रिल रोजी भारतीय बाजारात एक एंट्री-लेव्हल स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 120 हर्ट्झ डिस्प्ले, आयपी 52 रेटिंग आणि 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मोठी बॅटरी मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 07:45 PM
इंडियन मार्केटमध्ये लाँच झाला POCO चा लेटेस्ट स्मार्टफोन, हटके फीचर्स आणि किंमत तुमच्या बजेटमध्ये

इंडियन मार्केटमध्ये लाँच झाला POCO चा लेटेस्ट स्मार्टफोन, हटके फीचर्स आणि किंमत तुमच्या बजेटमध्ये

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Xiaomi च्या सबब्रँड असणाऱ्या POCO ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात POCO C71 या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आज 4 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 10,000 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच केला आहे. स्मार्टफोनची विक्री कधीपासून सुरु होणार आहे आणि स्मार्टफोमची किंमत व फीचर्स काय आहेत, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.

तासंतास रिल्स पाहिल्याने डोळ्यांवर होतोय परिणाम, अंधत्व येण्याची देखील शक्यता! तज्ज्ञांनी जारी केला इशारा

POCO C71 कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल?

POCO C71 हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4+64 GB आणि 6+128 GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4+64 GB व्हेरिअंटची किंमत 6,499 रुपये आहे आणि 6+128 GB व्हेरिअंटची किंमत 7,499 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर होईल. शाओमीचा हा फोन पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि डेझर्ट गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

POCO C71 स्मार्टफोनचा पहिला सेल 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून लाईव्ह होणार आहे. ते फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. POCO C71 हा मागील POCO C61 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये नवीन डिझाइन आणि अनेक अपग्रेड्स आहेत. नवीन मॉडेलमध्ये उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि थोडी मोठी स्क्रीन आहे. जलद चार्जिंगसोबतच, POCO C71 मध्ये मोठी बॅटरी देखील आहे.

POCO C71 launched in India

– 4GB RAM , 64GB storage
– UniSOC T7250 processor
– 32MP Rear Camera , 8MP Front Camera
– 6.88-inch 120Hz Adaptive HD+ Display
– 5200mAh battery
– 4G/3G/2G Connectivity
– Cool Blue, Desert Gold, Power Black pic.twitter.com/M1WFv9H1sg

— Mukul Sharma (@stufflistings) April 4, 2025

POCO C71 ची वैशिष्ट्ये

डिस्प्ले

POCO C71 मध्ये 6.88-इंचाचा HD+ (1640×720 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, वॉटरड्रॉप नॉच, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 600 nits हाय ब्राइटनेस मोड आणि वेट हँड टच सपोर्ट आहे. त्या तुलनेत, POCO C61 मध्ये 6.71-इंचाचा 90Hz डिस्प्ले होता.

प्रोसेसर

हा स्मार्टफोन Unisoc T7250 SoC प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचा AnTuTu स्कोअर 3,08,000 पेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त, यात 2TB पर्यंत वाढवता येणारा स्टोरेज सपोर्ट देखील आहे.

कॅमेरा

फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

स्मार्टफोनमध्ये 5,200mAh बॅटरी आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. बॉक्समध्ये 15W चा चार्जर देखील देण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर

सॉफ्टवेअरच्या बाबतीत, POCO C71 हा Android 15 वर चालतो. यात दोन वर्षांचे Android अपग्रेड आणि चार वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स आहेत.

हिऱ्यांनी जडलेला iPhone पाहून तुमचेही डोळ दिपतील! अशी आहे खास डिझाईन, किंमत पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

इतर वैशिष्ट्ये

POCO C71 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग आहे.

Web Title: Xiaomi poco c71 launched in indian market know about features price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
1

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
2

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
3

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
4

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.