तासंतास रिल्स पाहिल्याने डोळ्यांवर होतोय परिणाम, अंधत्व येण्याची देखील शक्यता! तज्ज्ञांनी जारी केला इशारा
हल्ली लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वयोगटातील मुलांना मोबाईल पाहण्याचे व्यसन लागले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे हल्ली लोकांसाठी एक गरज बनली आहे. सर्वचजण त्यांच्या दिवसातील बराच वेळ सोशल मीडियावर घालवतात. यामध्ये रिल्स स्क्रोल करणं, फोटो अपलोड करण यांसारख्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात. पण तासंतास सोशल मीडियावर घालवणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरत आहे. यामुळे आपल्या डोळ्यांवर प्रचंड परिणाम होत असून अंधत्व येण्याची देखील शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी जारी केला आहे.
खरं तर तांसतास एकाच ठिकाणी बसून रिल्स स्क्रोल करणं, ही फार गंभीर समस्या आहे. यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. तासंतास एकाच ठिकाणी बसल्याने पाठ दुखीच्या समस्या निर्णाम होतात. तसेच जास्त हालचाल न केल्याने आपलं वजन देखील वाढतं. एवढचं नाही तर तासंतास रिल्स पाहिल्याचा सर्वाच जास्त परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. स्मार्टफोनच्या किरणांसोबत आपला थेट संबंध येतो आणि यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो. डोळे जळजळणे, डोळ्यांतून पाणी येणं, डोळे लाल होणं यासांरख्या समस्या निर्माण होतात. पण या सर्व समस्यांमुळे अंधत्व येण्याची देखील शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी जारी केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सततच्या मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते तज्ज्ञांनी असे म्हटले आहे. इंस्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे नवनवीन माहिती समोर येत असली तरी देखील याचा सततचा वापर आपल्यासाठी हानिकार ठरू शकतो. जास्त स्क्रीन एक्सपोजरमुळे ‘डिजिटल आय स्ट्रेन’च्या आजारांना सामोरं जाव लागू शकतं.
सतत रिल्स पाहिल्यामुळे ड्राय आय सिंड्रोम, मायोपिया, डोळ्यांवर ताण येणं अशा समस्या निर्माण होतात. या सर्व समस्यांमुळे अंध्यत्व देखील येऊ शकते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे नुकत्याच एका विद्यार्थ्याची तक्रार आली होती, ज्यामध्ये त्याच्या पालकांनी सांगितलं होतं की, विद्यार्थ्याला डोळ्यांमध्ये सतत जळजळ होत आहे आणि त्याची दृष्टी अंधुक होत असल्याची तक्रार देखील केली. यानंतर संबंधित विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीनंतर असं आढळलं की, घरी बराच वेळ स्क्रीनवर रील पाहिल्यामुळे त्याचे डोळे पुरेसे ओलावा निर्माण करू शकत नव्हते. त्याला ताबडतोब आयड्रॉप देण्यात आले आणि 20-20-20 हा नियम पाळण्याचा सल्ला देण्यात आला.
तुम्ही देखील सतत मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर करत असाल तर 20-20-20 हा नियम तुमच्यासाठी देखील लागू केला जातो. या नियमाचा अर्थ असा आहे की, 20 मिनिटांनी 20 सेकंदांचा ब्रेक घेऊन 20 फूट अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पाहणे. यामुळे तुमच्या डोळ्यातील समस्या कमी होण्यास मदत होते. शिवाय स्क्रिनकडे सतत एकटक पाहत राहिल्याने डोळे मिचकावण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी होते, ज्यामुळे ड्राय आय सिंड्रोम होतो. तज्ज्ञांनी इशारा दिला की, जर ही सवय थांबवली नाही तर त्यामुळे अंधत्व येऊ शकते. त्यामुळे स्क्रीनकडे पाहत असताना सतत तुमचे डोळ मिचकवा आणि 20-20-20 हा नियम पाळा.