Price Dropped: 16 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दोन डिस्प्ले वाला Smartphone! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय उत्तम Deal
तुम्ही लेटेस्ट डिझाईनवाला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? अहो, मग वाट कसली बघताय. नवीन आणि लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. कारण ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन इंडियावर स्मार्टफोन कंपनी Lava च्या दोन डिस्प्लेवाल्या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांना 16 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कमी किंमतीत लेटेस्ट डिझाईनवाला स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात.
Tech Tips: Google Pay च्या या 5 स्मार्ट ट्रिक्स तुम्हाला बनवतील एक्सपर्ट! आजच फॉलो करा
Lava इंटरनेशनल लिमिटेडने त्यांच्या Agni 3 5G स्मार्टफोनवर लिमिटेड पीरियड ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर Amazon India वर Lava Days अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्हाला Lava Agni 3 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर घाई करा आणि ऑफरचा लाभ घ्या. या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन डुअल AMOLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा आणि बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Lava Agni 3 स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंट्सवर ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिअंट्सवर निवडक बँक डिल्ससह 5000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिअंटची मूळ किंमत 20,999, 22,999 आणि 24,999 रुपये आहे. मात्र ऑफर्ससह हे स्मार्टफोन व्हेरिअंट 15,998 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Lava इंटरनेशनल लिमिटेडने सुरु केलेली ही लिमिटेड पीरियड ऑफर 10 मे ते 18 मे पर्यंत व्हॅलिड असणार आहे. ही ऑफर HDFC, ICICI किंवा Axis Bank क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर उपलब्ध असणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे आणि ही ऑफर Amazon.in वर लिस्टेड सर्व Agni 3 मॉडेल्स लागू आहे.
Lava Agni 3 मध्ये डुअल AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाची 1.5K कर्व्ड स्क्रीन आणि 1.74-इंच रियर पॅनल आहे. हे MediaTek Dimensity 7300X प्रोसेसरला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये OIS सह 50MP Sony मेन सेंसर, 3X ऑप्टिकल झूमसह 8MP टेलीफोटो लेंस, 8MP अल्ट्रावाइड लेंस आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 28,649 रुपयांचं Discount! ही आकर्षक डिल मिस करू नका
या स्मार्टफोनमध्ये 66W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये Dolby Atmos सह स्टीरियो स्पीकर्स, कस्टमाइज़ेबल Action Key आणि 14 5G बँड्सचा सपोर्ट देखील आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित आहे, ज्यामध्ये तीन OS अपग्रेड्स आणि AGNI Mitra होम सर्विसचे ऑप्शन आहेत.