Tech Tips: Password शिवाय कनेक्ट करू शकता Wi-Fi, फक्त फॉलो कराव्या लागणार या स्टेप्स
वायफायच्या मदतीने तुम्ही मोठ्या फाईल्स आणि व्हिडीओ अगदी सहज डाऊनलोड करू शकता. कारण वायफाय तुम्हाला सुपरफास्ट स्पिडमध्ये इंटरनेट अॅक्सेस करण्याची परवानगी देतो. पण हा वायफाय कनेक्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते पासवर्ड. पासवर्डशिवाय तुम्ही वायफाय कनेक्ट करू शकत नाही. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही स्टेप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पासवर्डशिवाय देखील वायफाय कनेक्ट करू शकता.
WPS (वाय-फाय प्रोटेक्टेड सेटअप) एक अशी प्रोसेस आहे, ज्याला डिव्हाईसमध्ये सुरक्षित वाय-फाय कनेक्शन तयार करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. कनेक्शन इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला एक बटन दाबावं लागणार आहे आणि एक पिन टाकावा लागणार आहे. जेव्हा राउटर पेअरिंग मोडमध्ये जातो तेव्हा ही प्रोसेस बरीच फायद्याची ठरते. मात्र सध्याच्या स्मार्टफोन्समध्ये ही सेटिंग दिली जात नाही, कारण यामध्ये सुरक्षेसंबंधित अनेक त्रुटी आहेत. पण जर तुमच्याकडे Open System, WPA-Personal, आणि WPA2-Personal क्रेडेंशियलसह अन्य WPS-इनेबल डिवाइस असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता आणि यामुळे तुम्ही पासवर्डशिवाय देखील वायफाय कनेक्ट करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
हे डिवाइस प्रोविजनिंग प्रोटोकॉल (DPP), ज्याला वाय-फाय ईजी कनेक्ट प्रोसेस असं देखील म्हटलं जात. वाय-फाय अलायंस सर्टिफाइड प्रोसेस क्यूआर कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील वाय – फाय कनेक्शन इतर व्यक्तींसोबत शेअर करू शकता.