काय सांगता! Google Pixel च्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 15000 रुपयांचं डिस्काऊंट, दमदार कॅमेरा आणि मजेदार AI फीचर्सने सुसज्ज
टेक कंपनी आणि लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Google त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन a-सीरीज अंतर्गत लाँच केला जाणार आहे. आगामी स्मार्टफोन Pixel 9a या नावाने बाजारात एंट्री करणार असून तो मिडरेंजमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन अनेक अपग्रेड फीचर्स आणि रिडिजाइन कॅमेरा मॉड्यूलसह लाँच होईल. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा सुरु असून त्याचे काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.
iOS 18.4 Update: कधी रिलीज होणार iPhone चं नवीन अपडेट, काय असणार खास? इथे जाणून घ्या सर्वकाही
Pixel 9a या नव्या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर होण्यापूर्वीच आता जुन्या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. ई कॉमर्स फ्लिपकार्टवर Google Pixel 8a ची किंमत प्रचंड कमी झाली आहे. हा स्मार्टफोन तब्बल 15000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. खरं तर कंपनीने Google Pixel 8a स्मार्टफोन गेल्या वर्षी 2024 मध्ये लाँच केला होता. आता कंपनी येत्या काही दिवसांतच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. मात्र आता नव्या स्मार्टफोनच्या आगमनापूर्वीच जुन्या स्मार्टफोनच्या किंमती घसरल्या आहेत. ऑनलाइन डील आणि डिस्काऊंसह या स्मार्टफोनवर 15000 रुपयांची सूट दिली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने गेल्या वर्षी 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह Google Pixel 8a स्मार्टफोन 52999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह ग्राहकांना हा स्मार्टफोन तब्बल 37999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. शिवाय तुमच्याकडे गूगलचा जुना स्मार्टफोन असेल तर त्या एक्सचेंजवर तुम्हाला 2000 रुपयांची अतिरिक्त सुट देखील दिली जाणार आहे. म्हणजेच Google Pixel 8a तुम्हाला 15000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
यासोबतच, फोनवर बँक डिस्काउंटचा फायदा देखील घेता येईल. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या ईएमआय व्यवहारांवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. यासोबतच, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. तसेच, जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला अतिरिक्त सूट मिळू शकते. कंपनी काही जुन्या मॉडेल्सवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे.
Google Pixel 8a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि त्याची कमाल ब्राइटनेस 2000 निट्स पर्यंत आहे. Google Pixel 8a स्मार्टफोन Google Tensor G3 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, जो 8GB RaM सह अतुलनीय कामगिरी देतो. यासोबतच, या फोनमध्ये अॅडव्हान्स AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या गुगल फोनसाठी 7 प्रमुख अँड्रॉइड अपग्रेड्स देण्यात येतील.
IMI चे OpenAI वर गंभीर आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस; काय आहे संपूर्ण प्रकरण
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, Google Pixel 8A स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे, त्यासोबत 13 मेगापिक्सेलचा सेकंडरी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनच्या पुढच्या बाजूला 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गुगल पिक्सेल स्मार्टफोनमध्ये 4492 mah बॅटरी आहे.