IMI चे OpenAI वर गंभीर आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस; काय आहे संपूर्ण प्रकरण IMI चे OpenAI वर गंभीर आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस; काय आहे संपूर्ण प्रकरण
अमेरिकन कंपनी OpenAI च्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयाने OpenAI ला नोटीस, पाठवली आहे. इंडियन म्युझिक इंडस्ट्री (आयएमआय) ने OpenAI वर काही गंभीर आरोप केले आहेत, आणि OpenAI विरोधात याचिका देखील न्यायालयात दाखल केली आहे. आता याच प्रकरणी OpenAI ला नोटीस पाठवण्यात आली असून त्याच्यावर स्पष्टिकरण मागितलं आहे.
या देशातही बॅन झाला DeepSeek AI; अखेर चीनने दिली तीव्र प्रतिक्रिया, व्यापार मुद्द्यांचे राजकारण…
यापूर्वी एका न्यूज एजन्सीने देखील OpenAI वर गंभीर आरोप केले होते. संबंधित न्यूज एजन्सीने OpenAI वर कॉपीराइट उल्लंघनाचा खटला दाखल केला होता. आता पुन्हा एकदा OpenAI वर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता OpenAI च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यूज एजन्सी आणि इंडियन म्युझिक इंडस्ट्रीच्या गंभीर आरोपानंतर आता OpenAI ला नोटीस पाठवण्यात आली असून त्याचे न्यायालयाने अमेरिकन कंपनीकडून उत्तर मागितले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
न्यूज एजन्सीने OpenAI विरोधात दाखल केलेल्या खटल्यात म्हटलं होतं की, ओपनएआयने त्यांच्या चॅटजीपीटी मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी परवानगीशिवाय संबंधित न्यूज एजन्सीच्या सामग्रीचा वापर केला आहे. तर आता इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने देखील OpenAI वर काही गंभीर आरोप केले आहेत, ज्यामध्ये कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप देखील आहे. इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने म्हटलं आहे की, अमेरिकन कंपनीने त्यांच्या साउंड रिकॉर्डिंगचा वापर परवानगीशिवाय एआय प्रशिक्षणासाठी केला आहे.
इंडियन म्युझिक इंडस्ट्री टी-सीरीज, सारेगामा आणि सोनी म्युझिक इत्यादी अनेक मोठ्या बॉलीवूड लेबल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे त्यांना OpenAI आणि इतर AI कंपन्या संगीत कंपन्यांना काळजी आहे की OpenAI आणि इतर AI कंपन्या इंटरनेटवरून गाणी, लिरिक्स, म्यूजिक कंपोजिशन आणि साउंड रिकॉर्डिंग काढू शकतात. हे कॉपीराइटचे उल्लंघन करते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जर्मनीमध्येही अमेरिकन कंपनीविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता. यामध्येही, OpenAI वर त्यांच्या AI मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी परवानगीशिवाय कंटेट वापरल्याचा आरोप करण्यात आला.
6000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह धमाका करणार OnePlus चा ब्रँड न्यू स्मार्टफोन, वाचा स्पेसिफिकेशन्स
सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने म्हटले की, प्रभावित पक्षांनी त्यांचे खटले स्वतंत्रपणे दाखल करावेत. इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने दाखल केलेल्या खटल्याला न्यूज एजन्सीच्या खटल्यात समाविष्ट करता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होईल. अमेरिकेतही OpenAI विरुद्ध असेच खटले सुरू आहेत. द न्यू यॉर्क टाईम्ससह अनेक कंपन्यांनी OpenAI विरुद्ध खटले दाखल केले आहेत आणि अब्जावधी रुपयांची भरपाई मागत आहेत. डिपसिक आणि OpenAI मध्ये सुरु असलेल्या स्पर्धेदरम्यान आता ही नवीन प्रकरण समोर येत आहेत. या सर्व प्रकरणांबाबत अद्याप OpenAI ने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.