iOS 18.4 Update: कधी रिलीज होणार iPhone चं नवीन अपडेट, काय असणार खास? इथे जाणून घ्या सर्वकाही
तुम्ही देखील आयफोन युजर आहात का तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच अॅपल कंपनी iOS 18.4 अपडेट जारी करणार आहे. हे अपडेट आयफोन युजर्ससाठी विशेष असणार आहे, कारण यामध्ये अनेक नवीन फीचर्स समाविष्ट केले जाणार आहेत. iOS 18.4 अपडेटची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र काही अहवालांनुसार हे नवीन अपडेट आज लाँच केले जाऊ शकते. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
या देशातही बॅन झाला DeepSeek AI; अखेर चीनने दिली तीव्र प्रतिक्रिया, व्यापार मुद्द्यांचे राजकारण…
iOS 18.4 अपडेटमध्ये अनेक अपग्रेड फीचर्स समाविष्ट केले जातील. अहवालानुसार, iOS 18.4 चे बीटा व्हर्जन या आठवड्यात किंवा आज रिलीज केले जाऊ शकते. यानंतर, लवकरच सार्वजनिक रोलआउट देखील होईल. हे बीटा वर्जन आयफोन युजर्ससाठी एक नवीन अनुभव घेऊन येणार आहे. iOS 18.4 चं अपडेट युजर्ससाठी अतिशय खास असणार आहे कारण यामध्ये ईमोजीपासून रोबोट व्हॅक्यूमपर्यंत अनेक नवीन गोष्टींचा समावेश होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iOS 18.4 अपडेटसह, सिरीला आणखी स्मार्ट बनवण्यासाठी Apple इंटेलिजेंस प्रदान केले जाऊ शकते. या AI-पावर्ड बदलांमुळे सिरी स्क्रीनवर केली जाणारी कामे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल. अॅप्ससह इंटीग्रेशन चांगले होईल आणि पर्सनल रेफरेंसमध्ये देखील मदत करू शकेल. यासोबतच यामध्ये नवीन ईमोजी देखील समाविष्ट केले जाऊ शकतात, ज्यामध्ये झाडे नसलेली पाने आणि डोळ्यांखालील पिशव्या असलेल्यांचा समावेश असणार आहे. याशिवाय कंपनी या अपडेटमध्ये रोबोट वॅक्यूम देखील अॅड करणार आहे.
यावेळी अपडेटमधील सर्वात खास आणि सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘ऑन स्क्रीन अवेअरनेस’. या वैशिष्ट्यामुळे, सिरी स्क्रीनवर काय चालले आहे ते समजून घेण्यास सक्षम असेल आणि त्यानुसार कार्य करण्यास सक्षम असेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या मित्राने तुम्हाला त्यांचा पत्ता संदेशात पाठवला, तर तुम्ही फक्त “हा पत्ता त्यांच्या संपर्कात जोडा” असे म्हणू शकता आणि सिरी कोणत्याही अतिरिक्त कृतीशिवाय ते करू शकेल.
ही वैशिष्ट्ये सर्व iPhones वर उपलब्ध नसतील. Apple Intelligence फीचर्स आयफोन iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि iPhone 16 सिरीजमध्ये उपलब्ध असतील. अशी शक्यता आहे की ही AI बेस्ड Siri फीचर्स iOS 18.5 किंवा नंतरच्या iOS 18.4 बीटा वर्जनमध्ये विलंबाने उपलब्ध रिलीज केले जाऊ शकते. मात्र कंपनीने अद्याप याबाबत काही सांगितलं नाही.
अॅपलने यापूर्वी घोषणा केली होती की एप्रिलमध्ये सॉफ्टवेअर अपडेटसह अॅपल इंटेलिजेंस अधिक भाषांमध्ये विस्तारित केले जाईल. यामध्ये इंग्रजी (भारत, सिंगापूर), चिनी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि व्हिएतनामी यासारख्या भाषांचा समावेश असेल.
MacRumors नुसार, iOS 18.4 मध्ये नवीन इमोजी समाविष्ट असतील. डोळ्यांखाली पिशव्या असलेले चेहरे, बोटांचे ठसे, पाने नसलेली झाडे, मुळांच्या भाज्या, वीणा, फावडे, शिंपडे आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो. या अपडेटसह, सिरी पूर्वीपेक्षा अधिक वैयक्तिकृत अनुभव देईल. वापरकर्त्यांच्या पसंती ऑप्टिमाइझ केल्या जातील.