Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब… अशी आहे सोपी ट्रिक

WhatsApp Widget: तुम्ही देखील व्हॉट्सॲप यूजर आहात का? तुम्हाला देखील ऑनलाईन न दिसता आणि ब्लू टिक न दाखवता समोरील व्यक्तीने पाठवलेले मेसेज वाचण्याची इच्छा आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 11:00 AM
WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब... अशी आहे सोपी ट्रिक

WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब... अशी आहे सोपी ट्रिक

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅपचे 4×2 विजेट वापरून नवीन मेसेजेस अ‍ॅप न उघडताच होम स्क्रीनवर पाहता येतात.
  • या ट्रिकमुळे समोरील व्यक्तीला तुमचा ऑनलाइन स्टेटस किंवा ब्लू टिक दिसत नाही.
  • ही सेटिंग करण्यासाठी होम स्क्रीनवरील विजेट्स पर्यायातून व्हॉट्सअ‍ॅप विजेट निवडून ते होम स्क्रीनवर जोडावे लागते.
WhatsApp Trick: जगभरातील करोडो लोकं मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. कंपनी वेळोवेळी या मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये नवीन फीचर्सचा समावेश करत असते. ज्यामुळे यूजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा आणि त्यांची सुरक्षा देखील वाढावी, असं कंपनीचं उदिष्ट असतं. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या काही सोप्या आणि महत्त्वपूर्ण अशा ट्रिक्स देखील आहेत, ज्यामुळे यूजर्सची प्रायव्हसी आणखी वाढते. अशाच एका सोप्या पण फायद्याच्या ट्रिकबद्दल आता जाणून घेऊया.

BSNL Recharge Offer: सरकारी कंपनीची खास ऑफर; ‘या’ प्लॅनवर मिळणार फ्री बोनस डेटा… जाणून घ्या किंमत

व्हॉट्सअ‍ॅप ट्रिक

अनकेदा आपल्याला असं वाटतं की, समोरील व्यक्तीला न समजता त्याने पाठवलेले सर्व व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आपण वाचावे. पण सहसा आपण जेव्हा समोरील व्यक्तीचा मेसेज ओपन करतो, तेव्हा ब्लू टिक दिसू लागते किंवा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुमचा ऑनलाईन स्टेटस दिसतो. ज्यामुळे त्वरित समजते की, तुम्ही फोनवरील मेसेज वाचला आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, अशी एक सोपी ट्रिक आहे जी फॉलो करून तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर समोरील व्यक्तीला ऑनलाईन दिसता मेसेज वाचू शकता. यामध्ये ब्लू टिक देखील दिसणार नाही. या सोप्या आणि फायद्याच्या ट्रिकबद्दल आता जाणून घेऊया.

विजेट्सचा वापर करा

खरं तर ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करण्याची गरज नाही. तुम्ही एका खास व्हॉट्सअ‍ॅप विजेट्सच्या मदतीने हे काम अगदी सहज पूर्ण करू शकता. विजेट्सच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ओपन करताच तुम्ही थेट होम स्क्रीनवर नवीन मेसेज पाहू शकता. ज्या लोकांना त्यांच्या प्रायव्हसची सतत चिंता असते किंवा ज्यांना समोरील व्यक्तीला समजू द्यायचे नसेल की तुम्ही त्यांचा मेसेज वाचला आहे, अशावेळी ही ट्रिक फायद्याची ठरू शकते. चला तर मग आता या सोप्या ट्रिकबद्दल जाणून घेऊया.

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

व्हॉट्सअ‍ॅप विजेट्स कसे सेट कराल?

  • व्हॉट्सअ‍ॅप विजेट्स सेट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात आधी तुमच्या होम स्क्रीनवर काही सेकंद दाबून ठेवा.
  • आता समोर दिसणाऱ्या मेन्यूमधून विजेट्स पर्याय निवडा.
  • आता विजेट्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • इथे उपलब्ध असलेले 4×2 विजेट्स निवडा आणि होम स्क्रीनवर सेट करा.
  • यानंतर, व्हॉट्सॲपवर येणारे नवीन मेसेजेस थेट होम स्क्रीनवर दिसू लागतील.

Web Title: You can read whatsapp message without blue tick and online status here is easy trick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • whatsapp update

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.