
सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर...
एलन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, 10 नोव्हेंबरपासून Twitter.com डोमेन बंद केला जाणार आहे, म्हणजेच आता सर्व सेवा X.com डोमेनवर शिफ्ट केली जाणार आहेत. तथापी जास्त युजर्सवर याचा थेट परिणाम होणार नाही. मात्र काही अंकाऊंट्स असे आहेत ज्यांनी वेळीच योग्य पाऊलं उचलणं गरजेचं आहे, अन्यथा हे अकाऊंट लॉक होऊ शकतात.
iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर
X Safety टीमने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून सांगितलं आहे की, ज्या युजर्सनी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) साठी हार्डवेयर सिक्योरिटी की किंवा पासकी चा वापर केला आहे, त्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी त्यांची सिक्योरिटी X.com डोमेनवर पुन्हा एकदा रजिस्टर करावी लागणार आहे. जर युजर्सनी असं केलं नाही तर त्यांचं अकाऊंट एक्सेस बंद केला जाणार आहे आणि युजर्स पुन्हा लॉगिन करू शकणार नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
X ने स्पष्ट केलं आहे की, हा बदल कोणत्याही सुरक्षेशीसंबंधित धोक्याबाबत नाही तर हे एक टेक्निकल अपडेट आहे. सध्या सिक्योरिटी कीज ट्विटर डॉट कॉम (twitter.com) डोमेनसोबत जोडलेली आहेत. यांना X डॉट कॉम (x.com) सोबत जोडण्यासाठी री-एनरोल करणं गरजेचं आहे, ज्यामुळे आम्ही जुने डोमेन बंद करू.
जर कोणत्या युजरने 10 नोव्हेंबरपर्यंत त्यांची सिक्योरिटी री-एनरोल केली नाही तर त्यांचे अकाऊंट लॉक होणार आहे. जोपर्यंत युजर त्यांची सिक्योरिटी पुन्हा रजिस्टर करत नाही, वेगळी 2FA पद्धत निवडत नाही किंवा 2FA पूर्णपणे बंद करत नाही (जरी कंपनी 2FA चालू ठेवण्याची शिफारस करते).
जर तुमचे अकाऊंट आधीच लॉक केले गेले असेल, तर तुम्ही वरील तीन पर्यायांपैकी कोणत्याही एकाचा वापर करून पुन्हा प्रवेश मिळवू शकता (पुन्हा नोंदणी करा, नवीन 2FA पद्धत निवडा किंवा 2FA बंद करा).
एलन मस्क ने 2023 च्या शेवटी Twitter ची खरेदी केली आणि त्यानंतर त्याचं नाव बदलून एक्स असं केलं होतं. खरंतर, मस्कचे X.com शी जुने भावनिक नाते आहे. त्याने 1999 मध्ये X.com नाावाची एक फिनटेक कंपनी सुरु केली होती, नंतर या कंपनीचे नाव PayPal करण्यात आले.