Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित

Youtube Ghost Network Scam: युट्यूबवर एका नव्या स्कॅमची सुरुवात झाली आहे. या स्कॅमपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते. हा स्कॅम कसा सुरु होता, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 29, 2025 | 11:33 AM
Youtube वर पसरलंय 'घोस्ट नेटवर्क' चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच..... स्वत:ला असं ठेवा सुरक्षित

Youtube वर पसरलंय 'घोस्ट नेटवर्क' चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच..... स्वत:ला असं ठेवा सुरक्षित

Follow Us
Close
Follow Us:
  • युट्यूबवर घोस्ट नेटवर्कची दहशत!
  • एका क्लिकने तुमचा डेटा, अकाउंट आणि पैसे गायब
  • लिंकवर क्लिक करताच होईल मोठं कांड
युट्यूबवर आपण दररोज अनेक व्हिडीओ बघतो. शिक्षणापासून रेसिपीपर्यंत युट्यूबवर लाखो व्हिडीओ उपलब्ध आहेत. प्रत्येकासाठी युट्यूबवर त्याच्या आवडीनुसार व्हिडीओ अपलोड केले जातात. रोज करोडो लोकं युजर्स युट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ बघत असतात. असे अनेक व्हिडीओ असताता ज्यामध्ये एक लिंक दिलेली असते. ही लिंक एखाद्या दुसऱ्या व्हिडीओची असते किंवा एखाद्या वेबसाईटची. अनेक युजर्स या लिंकवर क्लिक करून दुसऱ्या व्हिडीओला किंवा वेबसाईटला भेट देतात. मात्र आता असं करणं महागात पडू शकतं.

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?

आता जर तुम्ही यूट्यूबवर एखादा व्हिडीओ बघितल्यानंतर त्याच्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही मालवेअरचे शिकार होऊ शकता. खरं तर, सिक्योरिटी रिसर्चरने यूट्यूबवर सुरु असलेल्या एका मोठ्या मालवेयर मोहिमेचा पर्दाफाश केला आहे. याला यूट्यूब घोस्ट नेटवर्क असं नाव देण्यात आलं आहे. हे नेटवर्क खोटे ट्यूटोरियल व्हिडीओ तयार करून आणि पायरेटेड चॅनेल वापरून लोकांच्या सिस्टममध्ये मालवेअरने संक्रमित करत होते. अलीकडेच चेक प्वाइंट येथील रिसर्चरने याचा पर्दाफाश केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कसं काम करत होतं हे नेटवर्क?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे नेटवर्क हजारो व्हिडिओ शिकवण्याच्या सॉफ्टवेअर इत्यादींद्वारे ऑपरेट केले जात होते. या ट्यूटोरियल व्हिडीओसह हॅकर्स माइक्रोसॉफ्ट ऑफिस सारख्या एखाद्या सॉफ्टवेअरचे क्रॅक वर्जन देण्याचे आश्वासन करत होते. व्हिडीओमध्ये गूगल ड्राइव किंवा ड्रॉपबॉक्समधून फाइल डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं जात होतं. जेव्हा युजर्स या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ डाऊनलोड करत होते तेव्हा त्यांच्या सिस्टिममध्ये मालवेयर इंस्टॉल होत होता. ज्यामुळे हॅकर्स सिस्टममधील पासवर्ड, कुकीज आणि लॉगइन इत्यादी माहिती चोरी करू शकत होते.

बनावट कमेंट्सने जिंकायचे युजर्सचा विश्वास

हि सिस्टम पूर्णपणे विश्वसनीय वाटावी यासाठी हॅकर्सनी पूर्ण बंदोबस्त केला होता. सिस्टम विश्वसनीय वाटावी यासाठी हॅकर्स व्हिडीओखाली बनावट कमेंट्स करत होते, ज्या खऱ्या वाटतील. कमेंटमध्ये फाइल ओपन करण्यासाठी पासवर्ड देखील दिले होते. ज्यामुळे लोकांना वाटू शकेल की दुसरी लोकं देखील या फाईल्स डाऊनलोड करू त्याचा वापर करत आहेत. हे नेटवर्क अतिशय संघटित पद्धतीने काम करत होते. हॅकर्स एक चॅनेल डिलीट होताच दुसरा चॅनेल्स तयार करायचे. याशिवाय, त्यांनी लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी चोरी केलेल्या YouTube चॅनेलवरून असेच व्हिडिओ देखील पोस्ट केले.

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

असं राहा सुरक्षित

सध्या इंटरनेटवर अनेक प्रकारचे स्कॅम सुरु आहेत. या स्कॅमपासून स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही अनोळखी नबंरवरून आलेल्या लिकंवर क्लिक करू नका. मोफत किंवा क्रॅक सॉफ्टवेअर देणाऱ्या लिंक्स टाळणे हाच सर्वोत्तम आणि सुरक्षित बचाव आहे. थोड्याशा लोभामुळे तुमचं मोठे नुकसान होऊ शकते.

Web Title: Youtube ghost network video can install malware in your system how to stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स
1

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स

Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन
2

Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन

Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह
3

Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
4

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.