YouTube चा नवा नियम! लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी लागू केलं वयाचं बंधन, काय आहेत नव्या गाइडलाइन्स? जाणून घ्या
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube च्या युजर्स संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. YouTube वर वेगवेगळ्या विषयावरील अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकण YouTube वर कोणते ना कोणते व्हिडीओ सतत पाहत असतो. याशिवाय असे अनेक युट्यूबर्स आहेत, जे YouTube वर लाईव्हस्ट्रिमिंग करून पैसे कमावतात. शिवाय अनेक गेमर्स देखील YouTube वर लाईव्हस्ट्रिमिंग करून पैसे कमावतात. मात्र आता YouTube ने लाईव्हस्ट्रिमिंगबाबतचे नियम बदलले आहेत.
चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाल, AI टूलवर…
YouTube ने लाइवस्ट्रीमिंग पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. YouTube ने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कंपनीने जारी केलेले हे नवीन नियम 22 जुलैपासून लागू केले जाणार आहेत. आता कोणताही युजर लाईव्हस्ट्रिम करणार असेल तर त्याचं वय कमीत कमी 16 वर्षे असणं आवश्यक आहे. म्हणजेच आता 16 वर्षांखालील मुलांना एकटे लाईव्ह जाण्याची परवानगी नाही. पूर्वी ही वयोमर्यादा 13 वर्षे होती, मात्र आता हे वयाचं बंधन वाढवण्यात आलं आहे. म्हणजेच आता 13 ते 15 वर्षे वयोगटातील युट्यूब क्रिएटर्सना लाईव्हस्ट्रीम करण्यासाठी प्रौढ व्यक्तीची मदत घ्यावी लागेल, त्याशिवाय ते लाईव्हस्ट्रिमिंग करू शकणार नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
YouTube ने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्सनुसार, जर एखाद्या यूट्यूबरचे वय 16 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याच्यासोबत कोणी वयस्कर व्यक्ती लाईव्हस्ट्रिम करण्यासाठी तयार असेल तर तर तो प्रौढ व्यक्ती चॅनेलचा संपादक, व्यवस्थापक किंवा मालक बनू शकतो. याद्वारे, तो प्रौढ व्यक्ती त्या YouTuber च्या चॅनेलवरून लाईव्हस्ट्रीम सुरू करू शकतो आणि त्याच प्रेक्षकांपर्यंत कंटेंट पोहोचवू शकतो.
या बदलानंतर आता अधिक कंटूंब यूट्यूबवर एकत्र लाईव्हस्ट्रिम करू शकतात. आता 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युट्यूबर्सना एकटं लाईव्ह स्ट्रिम करण्याची परवानगी नाही. त्यामुळे पालकांना केवळ तांत्रिक नियंत्रणच नाही तर लाईव्हस्ट्रीम दरम्यान मुलांवर लक्ष देखील ठेवावे लागेल. यामुळे मुले आणि पालकांमध्ये एक नवीन डिजिटल संबंध निर्माण होऊ शकतो.
कुटूंबातील व्यक्तींनी एकत्र लाईव्हस्ट्रिमिंग सुरु करणं ही केवळ मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करत नाही तर एकत्र वेळ घालवण्याचा एक नवीन डिजिटल मार्ग देखील बनू शकतो. ज्या लोकांना लाईव्हस्ट्रिमिंगची आवड आहे, अशा लोकांसाठी हे नवीन नियम फायद्याचे ठरणार आहेत.
फॅमिली लाईव्हस्ट्रीमिंग ऐकण्यासाठी मजेदार वाटत असले तरी, त्यात अनेक आव्हाने देखील येतात. लाईव्ह जाणे म्हणजे सर्व काही लगेच सर्वांना दिसते. अशा परिस्थितीत, गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होतो. पालक आणि मुलांमधील कोणत्या गोष्टी सार्वजनिक केल्या जाऊ शकतात आणि काय खाजगी ठेवल्या जाऊ शकतात याबद्दल स्पष्ट समज असणे महत्वाचे आहे. लाईव्हस्ट्रीम मनोरंजक असते आणि YouTube मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत नाही हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे.