Zomato ने खरेदी केली Paytm ची तिकीट सिस्टम! आता Paytm वरून तिकीट बुक होणार नाही (फोटो सौजन्य - pinterest)
ऑनलाईन पेमेंट अॅप Paytm मध्ये चित्रपट आणि इवेंट्ससाठी तिकीट बुक करण्याची सुविधा होती. मात्र आता मूळ कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ ही सुविधा विकण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने Zomato सोबत करार केला आहे. हा करार 2,048 कोटी रुपयांना पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता Zomato ने Paytm ची तिकीट सिस्टम 2,048 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. करारानुसार, Paytm च्या तिकीट सिस्टमच्या उपकंपन्या – ऑर्बजेन टेक्नॉलॉजीज (टिकेटन्यू) आणि वेस्टलँड एंटरटेनमेंट (इनसाइडर) यांना Zomato कडे हस्तांतरित केलं जाणार आहे. याशिवाय या विभागात काम करणारे 280 लोक देखील Zomato मध्ये जाणार आहेत.
हेदेखील वाचा- VIVO ने केलं स्मार्टफोन फोटोग्राफी स्पर्धेचं आयोजन
बिझनेस टुडेने सादर केलेल्या अहवालानुसार, 2017 मध्ये ऑनलाईन पेमेंट अॅप Paytm ने तिकीट सिस्टम खरेदी केली होती. या अंतर्गत चित्रपट आणि इवेंट्ससाठी तिकीट बुक करण्याची सुविधा होती. Paytm ची तिकीट सिस्टम थेट ‘बुक माय शो’ ची मुख्य स्पर्धक होती. यानंतर Paytm ने ऑर्बजेन टेक्नॉलॉजीज (टिकेटन्यू) आणि वेस्टलँड एंटरटेनमेंट (इनसाइडर) ची खरेदी केली. सुमारे 268 कोटी रुपयांना हा व्यवहार झाला होता. चित्रपटाची तिकिटे ‘तिकीटन्यू’ वर विकली जातात आणि लाईव्ह कार्यक्रमाची तिकिटे ‘इनसाइडर’ वर विकली जातात.
हेदेखील वाचा- Zoom ने वाढवली वेबिनारची क्षमता;10 लाख पार्टीसिपेंटस एकत्र सहभागी होऊ शकतील
ऑर्बजेन टेक्नॉलॉजीज (OTPL) ची स्थापना नोव्हेंबर 2007 मध्ये झाली. कंपनी चित्रपटाची तिकिटे आणि इतर सेवांची सूची आणि विक्रीचा व्यवसाय करत होती. तर, वेस्टलँड एंटरटेनमेंट (WEPL) ची स्थापना डिसेंबर 2015 मध्ये झाली. ही कंपनी इव्हेंट तिकिटे आणि इतर सेवांची सूची आणि विक्री करण्याच्या व्यवसायात आहे. त्यामुळे Paytm ने ऑर्बजेन टेक्नॉलॉजीज (टिकेटन्यू) आणि वेस्टलँड एंटरटेनमेंट (इनसाइडर) या कंपन्या खरेदी केल्या. यानंतर कालांतराने Paytm च्या तिकीट सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. लोकं चित्रपट आणि लाईव्ह इंव्हेंटची तिकीटं बुक करण्यासाठी Paytm च्या तिकीट सिस्टचा वापर करू लागली.
कालांतराने Paytm या क्षेत्रातील प्रमुख खेळाडू बनले. 2024 मध्ये कंपनीने 297 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आणि 29 कोटी रुपयांचा EBITDA समायोजित केला. पण आता वन 97 कम्युनिकेशन्सने नवीन धोरण स्वीकारले आहे. कंपनीने आता पेमेंट आणि वित्तीय सेवांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आहे. याचाच एक भाग म्हणून Zomato ने Paytm तिकीट सिस्टम खरेदी 2,048 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. हे संपूर्ण हस्तांतरण 12 महिने सुरू राहील. ऑर्बजेन टेक्नॉलॉजीज (टिकेटन्यू) संपादन किंमत रु. 1,264.6 कोटी आणि वेस्टलँड एंटरटेनमेंट (इनसाइडर) 783.8 कोटी असण्याचा अंदाज आहे. Zomato ने या संपूर्ण प्रक्रियेसाठी 90 दिवसांची घोषणा केली आहे.