आज मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर भायखळा – माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. अप जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.30 पासून दि. रविवारी पहाटे 4.05 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर डाऊन मार्गावर रविवारी मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
[read_also content=”राशीभविष्य, २४जुलै २०२२; ‘कन्या’ राशीतील लोक मानसिक भीतीने घाबरून जाणार आहे https://www.navarashtra.com/lifestyle/daily-horoscope-rashibhavishya-nrrd-307463.html”]
ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक असेल. पनवेल – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर – खारकोपर BSU मार्गा व्यतिरिक्त) मेगाब्लॉक घेण्यात येईल. ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल येथून रविवारी सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप सेवा आणि ठाणे येथून 10.01 पासून दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असतील.