विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला आणि महायुतीमध्ये वादंग निर्माण झाला. भाजपचा विरोध असून देखील मलिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत मित्र पक्षाच्या तीव्र विरोधानंतर देखील अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. यावर आता आशिष शेलार यांनी भाजप त्यांचा प्रचार करणार का हे सांगितले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांची कन्या अणुशक्ती नगर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना येथून कोणत्याही प्रकारे उमेदवारी देऊ नये, असं भाजपने मत व्यक्त केलं…