गाझा पुन्हा रक्ताळला! ट्रम्प यांच्या पीस प्लॅन पूर्वीच इस्रायलचा भयंकर हल्ला, १० हून अधिकांचा बळी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, गाझाच्या नासेर आणि शिफा शहरांमध्ये हल्ला करण्यात आला असून यामध्ये एका इमारतीला आणि छावणीला लक्ष्य करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये एका कुटुंबातील चार महिला आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच खान युनिसमध्ये झालेल्या हल्ल्यात आग लागली आहे. या आगीत सात जणांचा मृत्या झाला असून एका कुटुंबातील एक तीन चिमुरडे, तीन अल्पवयीन मुले आणि एक वडील असे मिळून सात जण बळी गेले आहेत.
धक्कादायक म्हणजे इस्रायलने हा हल्ला अशा वेळी केला आहे. जेव्हा ट्रम्प गाझात शांतता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी २० कलमी योजना आखली आहे. तसेच गाझा शांतता मंडळाची स्थापन करण्याची घोषणाही केली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला हा हल्ला मोठा धक्का मानला जात आहे. इस्रायली सैन्याने या हल्ल्याचे स्पष्टीकरण देताना दहशतवाद्यांना लक्ष्य करणार हल्ले म्हणून केले आहेत. तर मानवाधिकार संघटना आणि पॅलेस्टिनींनी याचा तीव्र विरोध करत जाणूनबुजून केलेला हल्ला केला आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेरिका आणि कतारच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमास युद्ध (Israel Hamas War) थांबवण्यात आले होते. पंरुत इस्रायलने गाझात जमिनीमार्गे कारवाई सुरुच ठेवली असून या कारवायांमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक निरापराध लोकांचा बळी गेला आहे. गाझातील परिस्थिती अजूनही भयंकर असून लाखो लोक स्थलांतरित झाले आहेत. तसेच मानवतावादी मदत देखील सर्व लोकांपर्यंत अद्याप पोहचलेली नसल्याने परिस्थिती भयंकर आहे.
Ans: इस्रायलने गाझाच्या नासेर आणि शिफा शहरांमध्ये हल्ला केला आहे.
Ans: इस्रायली हल्ल्यात गाझात लहान मुलांसह १२ जणांचा बळी गेला आहे.






