किरकोळ कौटुंबिक वादाचे रूप शनिवारी रात्री हिंसक झटापटीत बदलले. नेवाळी नाका परिसरात जेठाणीने आपल्या पती आणि मुलासोबत मिळून देवराणी गंगियादेवी साहूंवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यानंतर या प्रकरणातील दुसरे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारच्या चुकांचा पाढा वाचला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियावर शिंदे- फडणवीस- अजित पवार सरकारच्या चुका सांगितल्या आहेत.
, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. यानंतर या गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडने शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यामध्येच गोळीबार केला. या प्रकरणावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिस ठाण्यातच हा गोळीबार झाल्यामुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत आता गणपत गायकवाड यांनी धक्कादायक दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे हा गोळीबार केल्याचा खुलासा आमदार गायकवाड यांनी केला…