Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशच्या शेख हसीनाप्रमाणे ‘या’ देशांच्या प्रमुखांनीही सोडली आपली खुर्ची! भारतावरही अशी स्थिती येईल?

बांगलादेशातील हिंसक निषेधानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, बांगलादेशव्यतिरिक्त जगात असे अनेक देश आहेत, जिथली सरकारे याआधी उलथून टाकण्यात आली. पाकिस्तानसह अनेक देशांचा समावेश.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2024 | 02:51 PM
बांगलादेशच्या शेख हसीनाप्रमाणे 'या' देशांच्या प्रमुखांनीही सोडली आपली खुर्ची! भारतावरही अशी स्थिती येईल?

बांगलादेशच्या शेख हसीनाप्रमाणे 'या' देशांच्या प्रमुखांनीही सोडली आपली खुर्ची! भारतावरही अशी स्थिती येईल?

Follow Us
Close
Follow Us:

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातील हिंसक निषेधानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोमवारी संध्याकाळी जेव्हा जमाव पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसला तेव्हा हसिना हेलिकॉप्टरमधून देश सोडून पळून गेल्या. यावेळी आंदोलक पंतप्रधानांच्या राजीनाम्याचा आनंद साजरा करताना दिसले, तर बांगलादेश लष्कराने हे सुनिश्चित केले की अंतरिम सरकार लवकरच आपला कार्यभार स्वीकारेल. बांगलादेशात सत्तापालट होण्यापूर्वीही अनेक देशांमध्ये सत्तापालट झाले होते. चला तर मग याविषयीच आज सविस्तर जाणून घेऊयात.

बांगलादेशात सत्तापालट का झाली?

बांगलादेशातील सत्तापालटाची सुरुवात गेल्या महिन्यातील काही विरोध प्रदर्शनांतून सुरु झाली. जेव्हा बांगलादेश उच्च न्यायालयाने स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के कोटा बहाल करण्याच्या बाजूने निर्णय दिला. नोकरीतील आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी आणि पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे आंदोलक आणि समर्थक यांच्यात उसळलेल्या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे की संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता देशभरात लष्कर तैनात करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – सदृढ आरोग्यासाठी घरी बनवा ‘ओट्सचा लाडू’! चवीबरोबरच पोषणही मिळेल, त्वरित रेसिपी नोट करा 

बांग्लादेशव्यतिरिक्त कोणकोणत्या देशात झाली सत्तापालट

अफगाणिस्तानमध्येही 2021 मध्ये सत्तापालट झाली होती. जेव्हा देश तालिबानच्या ताब्यात आला आणि माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनाही देश सोडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये पळून जावे लागले. तालिबानने दोन दशके अमेरिकेशी लढल्यानंतर अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलमधील राष्ट्रपती भवनात ध्वज फडकावला.

श्रीलंका

बांगलादेशप्रमाणेच 2022 मध्ये, श्रीलंकेत काही निदर्शने मार्च महिन्यात सरकारच्या विरोधात सुरू झाली. जेव्हा श्रीलंकेच्या सरकारने देश दिवाळखोर झाल्याचे जाहीर केले तेव्हा हजारो श्रीलंकन ​​नागरिक रस्त्यावर उतरले. कोलंबोमध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या इमारतीला आंदोलकांनी घेराव घातला आणि गोटाबाया त्यांच्या गावी जा अशा घोषणांची मागणी नागरिक करू लागले . आंदोलक त्यांच्या खोल्यांमध्ये विश्रांती घेत असताना आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाचे अनेक व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पाकिस्तान

1958 मध्ये जनरल अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात पहिला लष्करी उठाव झाला. त्यावेळचे पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांनी पाकिस्तानची राज्यघटना रद्द केली आणि मार्शल लॉ घोषित केला, जो 27 ऑक्टोबरपर्यंत कायम चालू राहिला.

भारतामध्येही होऊ शकते का सत्तापालट?

भारताच्या लोकशाही संस्था इतक्या मजबूत आहेत की लष्कराला भारतात सत्तापालट करणे पूर्णपणे अशक्य आहे. याला अगदी नैसर्गिक कारणेदेखील आहेत. भारतीय लष्कराची स्थापना ब्रिटीशांनी केली होती आणि त्याची रचना पाश्चात्य देशांच्या धर्तीवर करण्यात आली होती. यासोबतच भारत सरकार खूप मजबूत आहे, त्यामुळे सत्तापालट सारखी परिस्थिती भारतावर याने फार कठीण आणि अशक्य आहे.

 

 

 

Web Title: Before bangladesh many countries presidents left their seats and ran away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 09:30 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence

संबंधित बातम्या

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण
1

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी
2

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप
3

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप

बांगलादेशात राजकीय गोंधळ! ढाका पोलिसांची अवामी लीगच्या फ्लॅश रॅलीवर मोठी कारवाई;  २०० हून अधिक नेत्यांना अटक
4

बांगलादेशात राजकीय गोंधळ! ढाका पोलिसांची अवामी लीगच्या फ्लॅश रॅलीवर मोठी कारवाई; २०० हून अधिक नेत्यांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.