Flower Pot Of India: एक अशी जागा जिचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार नसेल; हजारो फुलांच्या सानिध्यात जणू स्वर्गच वसे इथे...
भारतात अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जी निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. जगाच्या कानाकोऱ्यातून अनेक पर्यटक या ठिकाणांच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी देशात येत असतात. देशात अनेक सुंदर मंदिरं, ऐतिहासिक ठिकाणं आहेत ज्यांचे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे मात्र आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत. हे ठिकाण आपल्या सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण कर्नाटकात वसले आहे, ज्याला गुंडलुपेट फ्लॉवरपॉटच्या नावाने ओळखले जाते. हे एक विशाल सूर्यफुलाचे शेत आहे, ज्याचे सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल ‘वाह, काय स्वर्ग आहे!’ हे हिरवेगार शेत सूर्यफूल आणि झेंडूच्या फुलांनी व्यापलेले आहे.बेंगळुरूपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण वीकेंडसाठी एक उत्तम पर्याय आहे. कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात असलेले गुंडलुपेट हे एक शांत आणि सुंदर गाव आहे. चला या ठिकाणाविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Travel: जगाच्या कोपऱ्यात वसलंय एक रहस्यमयी गाव, इथे जाताच गायब होतात लोक; सरकारनेही केलेत हात वर
फ्लावर पॉट ऑफ इंडिया
बेंगळुरूपासून अवघ्या 200 किमी अंतरावर, गुंडलुपेट ठिकाण वसले आहे, जे फिरण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण आहे. या सुंदर ठिकाणाचा प्रवासही तितकाच मजेशीर आहे. हिरवेगार डोंगर आणि चमकदार पिवळ्या सूर्यफुलांची शेतं या प्रवासाला आणखीनच प्रेक्षणीय बनवतात. तुम्ही गुंडलुपेट जवळ जाताच, दोन्ही बाजूला सूर्यफुलाची शेतं तुमचं मोकळ्या हातांनी स्वागत करतील, त्यामागील हिरव्यागार टेकड्या हे दृश्य आणखी सुंदर बनवतील.
“गुंडलुपेट” म्हणजे कन्नड भाषेत “फ्लॉवर पॉट” आणि हे नाव त्या जागेला अगदी तंतोतंत बसते. दूरवर पसरलेली सूर्यफूल आणि झेंडूची फुले येथे आनंदी आणि रंगीबेरंगी वातावरण निर्माण करतात. निरभ्र निळे आकाश आणि हलकी थंड हवा या ठिकाणाचे सौंदर्य आणखीनच वाढवते. हे एक परिपूर्ण ठिकाण आहे जिथे तुम्ही आरामात बसू शकता आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
गुंडलुपेटची सूर्यफुलाची शेतं जून ते सप्टेंबर दरम्यान सर्वात सुंदर असतात, जेव्हा पावसाळ्यात फुलं फुललेली असतात. ही मनमोहक पिवळी फुले विलोभनीय दृश्य दाखवतात. फोटो काढण्यासाठीही हे एक परफेक्ट स्पॉट आहे. फील्डचे मालक केवळ 50 रुपये इतके शुल्क आकारतात, त्यामुळे पर्यटक येथे सूर्यफुलाची सुंदर छायाचित्रे सहजपणे घेऊ शकतात. ही फील्ड आता पर्यटकांसाठी एक प्रसिद्ध सेल्फी स्पॉट बनली आहे आणि येथील शांत वातावरण निवांत अनुभव देते.
गुंडलुपेटचे सूर्यफुलाचे शेत हे मुख्य आकर्षण असू शकते, परंतु जवळपास इतर अनेक उत्तम ठिकाणे आहेत जी भेट देण्यासारखी आहेत
महाराष्ट्रातील ‘मिनी काश्मीर’ माहिती आहे का? निसर्गाच्या कुशीत ‘या’ ठिकाणी लपलंय…
इथे कसे जात येईल?
गुंडलुपेट येथे पोहोचणे खूप सोपे आहे आणि तिथे प्रवास देखील खूप आरामदायी आहे. तुम्ही बेंगळुरूहून म्हैसूर-उटी महामार्गाने किंवा म्हैसूर-कालिकत NH-212 महामार्गाने येथे पोहोचू शकता. शिवाय, NH-67 महामार्ग देखील गुंडलुपेटला राज्याच्या इतर भागांशी जोडतो. हा मार्ग पूर्णपणे चांगला आहे,प्रवासावेळी तुम्हाला आजूबाजूला अनेक सुंदर दृश्ये दिसतील ज्यामुळे तुमचा प्रवास आणखीन मजेदार होईल.