
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Seagulls Bird At Harnai : दापोली तालुक्यातील हर्णे-पाळंदे समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी प्रमाणे हिवाळी हंगामात दिसणाऱ्या स्थलांतरित समुद्री पक्ष्यांचे आगमन यंदाही सुरू झाले आहे. 01 ऑक्टोबर 2026 रोजी हर्णे-पाळंदे बीचवर ‘सीगल’ (Seagull) पक्ष्यांचे 2026 मधिल हंगामातील पहिले दर्शन झाले आहे.
सीगल पक्षी मोठ्या प्रमाणात दापोली येथील समुद्र किनाऱ्यावर येतात. सीगल पक्षी दापोलीतील दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले आडे पाडले आणि केळशी येथील समुद्र किनाऱ्यावर येतात. हे पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत असते.
समुद्री जीव व अधिवास संवर्धन संशोधक फहाद जमादार हे नेहमीप्रमाणे हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी नियमित प्रमाणे गस्त घालत असतात तसेच समुद्री जैवविविधतेचे निरीक्षण करत असताना त्यांना समुद्रकिनारी सीगल पक्षी आढळून आले आहे. संशोधक फहाद जमादार यांनी या निरीक्षणाची नोंद केली आहे. यामुळे यंदाच्या स्थलांतरित समुद्री पक्ष्यांच्या हंगामाला सुरुवात झाल्याचे प्राथमिक निरीक्षण समोर आले आहे.
‘विघ्नहर्त्या दुष्काळ दूर कर’! अंगारकीला गणपतीपुळ्यात भाविकांचे ‘श्रीं’च्या चरणी साकडे
हर्णे-पाळंदे परिसरातील समुद्रकिनारा हा विविध प्रकारच्या समुद्री जीवसृष्टीसह स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास मानला जातो. विशेषतः हिवाळ्याच्या काळात या परिसरात विविध समुद्री व किनारी पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते. स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन हे परिसरातील समुद्री आणि किनारी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे अशा पक्ष्यांचे नियमित निरीक्षण, छायाचित्रण, नोंदणी आणि अधिवासाचे संवर्धन करणे आवश्यक ठरत आहेत.
हर्णे-पाळंदे किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या अभ्यासासाठी अशा नोंदी भविष्यात उपयुक्त ठरू शकतात. यंदाच्या हंगामात पुढील काळात सीगलसह आणखी कोणकोणते स्थलांतरित पक्षी हर्णे-पाळंदे किनारपट्टीवर दाखल होतात, याकडे सर्व पक्षीप्रेमी आणि समुद्री जैवविविधता अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
सीगल पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून दरवर्षी थंड प्रदेशातून म्हणजे; सायबेरिया किंवा उत्तर युरोप या देशातून येतात. हे पक्षी अन्नाच्या शोधात आणि अनुकूल हवामानासाठी कोकण किनारपट्टीवर स्थलांतर करतात.
हर्णे आणि मुरूड-दापोली परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर या पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आणि पक्षीप्रेमी येथे हजेरी लावतात. हे पक्षी सागरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग असून, त्यांच्या आगमनावरून किनारपट्टीच्या आरोग्यदायी वातावरणाचा अंदाज घेतला जातो.
Diveagar Breaking: मन सुन्न करणारी घटना! दिवेआगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू