Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरडा नाही तर हा आहे डोंगर…! जगातील असे एक ठिकाण ज्याचा दरदिवसाला बदलतो रंग, निसर्गाच्या ‘या’ अद्भुत चमत्काराला नक्की भेट द्या

रंग बदलणारा डोंगर तुम्ही कधी पाहिला आहे का? तुम्हाला जे जाणून आश्चर्य वाटेल पण जगात असा एक डोंगर आहे, जो प्रत्येक दिवशी नवीन रंग धारण करतो. याचे नैसर्गिक सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2025 | 02:31 PM
सरडा नाही तर हा आहे डोंगर...! जगातील असे एक ठिकाण ज्याचा दरदिवसाला बदलतो रंग, निसर्गाच्या 'या' अद्भुत चमत्काराला नक्की भेट द्या

सरडा नाही तर हा आहे डोंगर...! जगातील असे एक ठिकाण ज्याचा दरदिवसाला बदलतो रंग, निसर्गाच्या 'या' अद्भुत चमत्काराला नक्की भेट द्या

Follow Us
Close
Follow Us:

सरडा हा रंग बदलणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. तो आजूबाजूच्या स्थितीवरून आपला रंग बदलू शकतो. आजवर रंग बदलण्याचे हे कौशल्य फक्त सरड्यातच आहे असे आपल्याला वाटत होते मात्र असे नसून तुम्हाला माहिती आहे का? जगात एक असा डोंगर देखील आहे जो दर दिवसाला आपला रंग बदलतो. रंग बदलणारा हा रंग ऑस्ट्रेलियात आढळून आला आहे. हा डोंगर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला रंग बदलतो, याचा रंग प्रत्येक ऋतूत बदलत जातो. रंग बदलणाऱ्या या डोंगराच्या भागात आदिवासी लोक राहतात. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या पर्वताचा शोध लागला होता. 1873 मध्ये इंग्रज डब्लू जी गोसे यांनी याचा शोध लावला. त्यावेळी हेन्री आर्यस पंतप्रधान असल्याने ही बोट डोंगगला आर्यस रॉकला देण्यात आली होती, परंतु स्थानिक लोक ते उलुरु पर्वत म्हणून ओळखत होते.

अद्याप बर्फ वितळला नाही पण केदारनाथचे दार ‘या’ दिवशी उघडणार, अशाप्रकारे करा प्रवासाची तयारी

अंडाकृती आकाराचा हा डोंगर 335 मीटर उंच असून त्याचा परीघ 7 किलोमीटर आणि रुंदी 2.4 किलोमीटर आहे. खडकाचा रंग साधारणपणे लाल असतो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी त्याचे रंग चमत्कारिकरित्या बदलतात. पहाटे सूर्याची किरणे त्यावर पडली की तो डोंगर जणू पेटला आहे आणि त्यातून लाल आणि गडद लाल ज्वाळा बाहेर पडत आहेत असे वाटू लागते. त्याचप्रमाणे, जेव्हा सूर्य संध्याकाळी फिकट गुलाबी होतो, तेव्हा या डोंगरावर जांभळ्या सावल्या दिसू लागतात.

डोंगराचा रंग का बदलतो?

वास्तविक, डोंगराचा रंग बदलणे हा एक चमत्कार नसून त्याच्या विशेष निर्मितीमुळे असे घडून येते. त्याच्या दगडाची निर्मिती विशेष आहे, जी सूर्यप्रकाशाचे बदलते. हवामानातील बदल यामुळे त्याचे रंग दिवसभर बदलत राहतात. हा पर्वत वालुकामय खडकापासून बनलेला आहे, ज्याला कंग्लोमेरेट रॉक असेही म्हणतात. सकाळ आणि संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात लाल आणि केशरी रंगांचे वर्चस्व असते, त्यामुळे वातावरणातून इतर रंग विखुरले जातात. दोन्ही रंगांमुळे आणि वालुकामय खडकाच्या विशेष रचनेमुळे, पर्वत लाल आणि केशरी दिसतो. संध्याकाळच्या वेळी, सूर्यप्रकाशाशिवाय इतर रंग जास्त प्रमाणात दिसतात. रंगांच्या बदलांमुळे, प्राचीन काळी येथे राहणारे आदिवासी लोक याला देवाचे घर मानत असत. हे आदिवासी डोंगराच्या पायथ्याशी बंदिस्त गुहांमध्ये पूजा करतात. आता या डोंगरावर जाण्यासाठी रस्ते बांधण्यात आले आहेत. इथे मोठ्या संख्येने पर्यटक निसर्गाचा हा चमत्कार पाहायला येत असतात.

एक असे मंदिर जिथे लोक आपली इच्छा नाही तर तक्रारी घेऊन जातात…

ऑस्ट्रेलिया सरकारने या डोंगराजवळ ४८७ चौरस एकर परिसरात माउंट ओल्गा नॅशनल पार्क तयार केले. यात कांगारू, बँडीकूट, वालाबी, युरो असे विचित्र प्राणी ठेवलेले असतात. येथे विविध प्रकारची झाडे वाढतात. हा देखावा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लोक येतात. काही लोक कित्येक किलोमीटर दूर बसून दिवसभर त्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतात. काही लोक या डोंगरावर ट्रेकिंगही करतात. रंग बदलणारा असा हा डोंगर जगात दुसरा कुठेच नाही. सूर्योदयाच्या वेळी सोनेरी, दिवसा लाल किंवा केशरी आणि सूर्यास्ताच्या वेळी गडद लाल अशा शैलीत याचे रंग बदलत जातात. बदलणारे हे रंग डोंगराचे सौंदर्य आणखीनच वाढवतात. चीनमधील इंद्रधनुष्य पर्वत देखील काही प्रमाणात रंग बदलतो. पेरूचा विनिकुंका किंवा रेनबो माउंटन देखील असाच आहे. अमेरिकेतील एंटेलोप कॅनियन देखील दिवसातून अनेक वेळा आपला रंग बदलतो.

Web Title: Mountain that changes multiple colors mystery revealed travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • amezing facts
  • lifestyle tips
  • travel news

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट
2

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
3

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
4

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.