पेंच नॅशनल पार्क: लांब चोचीच्या गिधाडांचे घर; वन्यजीव प्रेमींसाठी अनोखा अनुभव
नागपूर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध वन्यजीव क्षेत्र पेंच नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह, नागपूर येथे आता एक नवीन आकर्षण जोडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धोक्यात आलेल्या लांब चोचीच्या गिधाडांसाठी घर हे पार्क तयार करण्यात आले आहे. ही पर्यावरणीय संरक्षणात एक मोठी उपलब्धी असून, पर्यटकांना जंगल सफारीसह या दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) सोबत मिळून लांब चोचीच्या गिधाडांचे पुनर्वसन सुरू केले आहे.
हे गिधाड त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा स्थिर होण्यासाठी पेंचच्या जंगलात आणले गेले आहे. या गिधाडांना हरियाणातील पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रातून 21 जानेवारी रोजी आणले होते. या गिधाडांना ‘ईस्ट पेंच पिपरिया रेंज’ मधील ‘मध्य बोदलजिरा बीट’ या ठिकाणी पक्षीगृहात ठेवण्यात आले होते, जेथे त्यांनी स्थानिक वन्य गिधाडांशी जुळवून घेण्यासाठी सात महिने घालवले. त्यांच्या व्यवहारक्षमतेची चाचणी घेण्यासाठी, 10 ऑगस्ट रोजी या गिधाडांना जंगलात सोडण्यात आले.
हे देखील वाचा- लक्षद्वीपची ‘ही’ ठिकाणे आहेत खूप सुंदर; समुद्रप्रेमींसाठी अतुलनीय अनुभव
गिधडांच्या हालचाल आणि वर्तनाचा अभ्यास सुरू
या गिधाडांनी जंगली गिधाडांसह मृत चितळ खाल्ल्याने त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा स्थिर होण्याची प्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प आणि BNHS यांनी सर्व गिधाडांना जीपीएस टॅग लावले आहेत, ज्यामुळे त्यांची हालचाल आणि वर्तनाचा अभ्यास केला जाऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. हे जीपीएस टॅग त्यांच्या स्थानिक वन्यजीवातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
टायगर सफारीसोबत हे नॅशनल पार्कही आकर्षण ठरेल
याशिवाय गिधाडांनी जंगलात परत गेल्यावर लगेचच माणसांपासून दूर राहणे शिकले आहे, जे त्यांच्या पुनर्वसनाच्या यशाचे प्रतीक आहे. पेंच नॅशनल पार्कमध्ये आता पर्यटकांना गिधाडांचे निरीक्षण करण्याची आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात या दुर्मिळ पक्ष्यांच्या हालचाली पाहण्याची अनोखी संधी मिळेल. पेंचच्या घनदाट जंगलात, आता टायगर सफारीसोबत हे अनमोल पक्षी पर्यावरण प्रेमींसाठी आकर्षण ठरतील. तुम्हाला देखील याचा अनुभव घेयाचा असेल तर या नॅशनल पार्कला नक्की भेट द्या.