फोटो सौजन्य: iStock
जैन धर्माच्या पाच प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे प्रमुख ठिकाण जे राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आहे. हे मंदिर पालीजवळील रणकपूर गावात असून तीर्थंकर ऋषभनाथांचे मंदिर आहे. हे जैन मंदिर चतुर्मुख धरण विहार म्हणूनही ओळखले जाते. तीर्थंकर ऋषभनाथांचे हे मंदिर जोधपूरपासून 162 किमी आणि उदयपूरपासून 91 किमी अंतरावर आहे. जैन धर्माच्या स्थापत्यकलेची आवड असणाऱ्या पर्यटक या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकतात. या प्राचीन मंदिरांमध्ये केलेल्या सुंदर कोरीव कामांसाठी हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. हे जैन मंदिर भारतीय वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. जे पाहणे एक विलक्षण आनंद आहे.
चौमुखी मंदिर
राणा कुभांच्या काळात म्हणजे 15 व्या शतकात या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. म्हणून या ठिकाणाला रणकपूर असे नाव ठेवण्यात आले. रणकपूरमधील हे जैन मंदिर जैन धर्मातील चोवीस तीर्थकरांपैकी पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांचे असून हे मंदिर चार तोंडी आहे. म्हणजे हे मंदिर चारही दिशांना उघडते, म्हणून या मंदिराला चौमुखी मंदिर देखील म्हटले जाते. रणकपूरचे तीर्थंकर ऋषभनाथांचे हे मंदिर संगमरवरी दगडांनी बनलेले आहे.
या मंदिराला 29 भव्य खोल्या आहेत. या मंदिरात 1444 खांब आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर केलेले कोरीव काम हे सर्व एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. येथील मंदिराच्या भिंतींवर केलेले नक्षीकाम अतिशय सुंदर आहे.या मंदिराच्या शिखरावर एक घंटा आहे. ज्याचा आवाज संपुर्ण मंदिरामध्ये घुमतो. याशिवाय मंदिराच्या परिसरात नेमिनाथ भगवान आणि पारसनाथ भगवानांची दोन मंदिरे आहेत. या मंदिरावर देखील सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. या मंदिरापासून 10 किमी अंतरावरच आंबा मातेचे मंदिर देखील आहे.
रणकपूरला कसे जायचे?
तुम्हाला जर या जैन मंदिराला भेट देण्याची इच्छा असे तर तुम्ही दिल्ली आणि मुंबईमधून विमानाने प्रवास करू शकता. रणकपूरच्या सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे उद्यपूर आहे. याशिवाय तुम्ही रेल्वेन देखील प्रवास करू शकता. राणकपूरसाठी जवळचे रेल्वे स्टेशन फालना आणि राणी जिल्हा पाली आहे. सर्व प्रमुख शहरांमधून येथे गाड्या उपलब्ध आहेत. जर तु्म्ही स्वत: तुमच्या गाडीने प्रवास करणार असाल तर रणकपूर हे उदयपूरपासून 98 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण देशातील प्रमुख शहरांशी रस्त्यांद्वारे जोडलेले आहे. जेथे फलना बससेवा उपलब्ध आहे.