अद्याप बर्फ वितळला नाही पण केदारनाथचे दार 'या' दिवशी उघडणार, अशाप्रकारे करा प्रवासाची तयारी
भारतातील लोकप्रिय धार्मिक स्थळांपैकी केदारनाथ एक आहे . इथले सौंदर्य कोणत्या स्वर्गाहून कमी वाटत नाही. गढवाल हिमालयाच्या नयनरम्य टेकड्यांमध्ये वसलेले केदारनाथ मंदिर सहा महिने बंद राहिल्यानंतर 2 मे 2025 रोजी भक्तांसाठी पुन्हा उघडणार आहे. हे मंदिर, सर्वात पवित्र हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. केदारनाथ यात्रेत दरवर्षी हजारो भाविक दूरदूरवरून येथे येत असतात. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात 11,968 फूट उंचीवर आहे. हे मंदिर एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वर्षातील सुमारे सहा ते सात महिने यात्रेकरूंसाठी खुले असते आणि हंगामात दरवर्षी सुमारे 20 लाख यात्रेकरू भेट देतात. तुम्हीही केदारनाथ धामला खूप दिवसांपासून भेट देण्याचा विचार करत असाल तर याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
दरवाजे किती वाजता उघडतील?
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय प्रसाद थापलियाल यांनी पुष्टी करत सांगतिले आहे की, केदारनाथ मंदिराचे दरवाजे 2 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता उघडतील. महाशिवरात्रीची शुभ तारीख उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात पारंपारिक पूजेनंतर ठरवण्यात आली, जिथे हिवाळ्यात केदारनाथची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत 2 मे रोजी भाविक केदारनाथ मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकतात.
केदारनाथ धाममध्ये अजूनही बर्फ वितळलेला नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केदारनाथ धामवर अजूनही 3 फुटांपेक्षा जास्त बर्फ आहे आणि येथे सतत बर्फवृष्टी होत आहे. अशा परिस्थितीत येथील हवामान अजूनही खराब आहे, तर बहुतांश वेळा ढगाळ वातावरण असल्याने बर्फ वितळण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे चारधाम यात्रेच्या तयारीबाबत थोडी साशंकता आहे.
केदारनाथसाठी तयारी कशी करावी
केदारनाथ यात्रेत साधारण 16 किलोमीटरची चढण करावी लागते. अशा परिस्थितीत, स्वतःला शारीरिकदृष्ट्या तयार ठेवणे महत्वाचे आहे, कारण प्रवासात चालणे, हलके ट्रेकिंग किंवा पायऱ्या चढणे यांचा समावेश आहे. यासोबतच चांगले आणि मजबूत शूज निवडणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
राजस्थानच्या ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट द्या; सुंदर, ऐतिहासिक आणि रोमांचक राज्य
रजिस्ट्रेशन करायला विसरू नका
केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना प्रवास सुरू करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करणे अनिवार्य आहे. तुम्ही अधिकृत पोर्टलद्वारे किंवा ट्रॅव्हल एजन्सीच्या मदतीने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमचे नाव नोंदवण्यासाठी तुम्ही registrationandtouristcare.uk.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ही प्रक्रिया आधार कार्डद्वारे पूर्ण करू शकता.
केदारनाथ यात्रेदरम्यान कुठे राहायचे?
तुमच्या केदारनाथ ट्रिपसाठी, तुम्ही केदारनाथमध्येच राहू शकता. इथे गेस्ट हाऊस, वसतिगृहे आणि आश्रम यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. यात तुम्हाला खाण्या-पिण्याची सुविधाही पुरवली जाईल. मंदिराच्या जवळ असलेल्या पंजाब सिंध आवास, बिकानेर हाऊस आणि हिमाचल हाऊस यांसारख्या खाजगी धर्मशाळा आहेत जिथे तुमच्या राहण्याच्या सोय होऊ शकते. या वीज चार्जिंग पॉइंट्स आणि गरम पाणी, चार्जिंग पॉइंट्स आणि साधे जेवण मिळते.