गेल्या २४ तासांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पाथर्डी तालुक्यात देखील काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेले आहेत. करंजी गावात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. गावातील पहाटे पाचच्या दरम्यान करंजी गावात पाणी शिरण्यास सुरुवात झाले. करंजी गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे शेती पूर्णपणे वाहून गेले आहे. काही कुटुंबांच्या वाहन देखील या वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेले असून मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर या पावसात जनावरांची देखील मोठी हानी झाली असून या पावसात अनेक जनावरे दगावल्याची माहिती मिळत आहे. अनेक गोवंशीय जनावरे या वाहत्या पाण्यात वाहून गेले आहे. करंजी गावातील सद्य परिस्थितीचा आढावा आमचे नवराष्ट्र चे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी घेतला आहे.