Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊसानंतर १७ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु, शेकडो नागरिकांचे स्थलांतर

पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला असून संततधार पाऊस सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर 17 धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे काहींना स्थलांतरित करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 15, 2025 | 06:06 PM
Water released from 17 dams after heavy rains in Pune district rain update marathi news

Water released from 17 dams after heavy rains in Pune district rain update marathi news

Follow Us
Close
Follow Us:

Pune Rain News : पुणे : संपूर्ण राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पुण्यामध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरु असून पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघरला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यामध्ये अजूनही पाऊस सुरु असून यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून येत आहे.  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने धरणसाठ्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी तब्बल १७ धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे.

परतीच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. यात १५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पाण्याचा मोठा बॅकवॉटर साचला. यामुळे १०० ते १५० नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती पोलीस नियंत्रण कक्षाचे एपीआय अंबिके यांनी दिली. दरम्यान थेऊर येथील बचावकार्य सुरू करून, यावर तातडीने स्थानिक नागरिक, प्रशासन आणि आपदा मित्र यांच्या मदतीने मदतकार्य सुरू झाले. पीएमआरडीएच्या पीडीआरएफ जवानांनी ३.३० वाजता घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले. त्याचवेळी एनडीआरएफ टीमलाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

एनडीआरएफचे जवान पहाटे ५ वाजता घटनास्थळी दाखल झाले व साधारण ५० ते ५५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. काही नागरिकांना टेरेसवर थांबवण्यात आले होते. या भागातील ओढ्यावर अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबून पूरस्थिती निर्माण झाली होती. अखेर रस्ता फोडून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सणसर येथे ४८० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मौजे सणसर (ता. इंदापूर) येथे देखील ओढ्याच्या पाण्याने घरांमध्ये शिरकाव केला. त्यामुळे १२० कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अंदाजे ४८० नागरिकांना छत्रपती हायस्कूल, सणसर येथे तात्पुरता आसरा देण्यात आला आहे.
मुंबई हवामान वेधशाळेने पुणे जिल्ह्यासाठी १५ व १६ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे आणखी पावसाची शक्यता असल्याने प्रशासन हायअलर्टवर आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी

शासनाने निश्चित केलेल्या पावसाच्या सरासरी प्रमाणानुसार, जून ते सप्टेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात साधारण ८६२ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो, तर जून ते ऑक्टोबरदरम्यान ९४० मि.मी. सरासरी पाऊस पडतो.
सन २०२५ मध्ये आजअखेरपर्यंत पडलेल्या पावसाची स्थिती अशी आहे :

  • जून २०२५ : सरासरी १७६.२ मि.मी., प्रत्यक्ष पाऊस २४९.१ मि.मी. (१४१.४%)
  • जुलै २०२५ : सरासरी ३०९ मि.मी., प्रत्यक्ष पाऊस २३०.६ मि.मी. (७४.६%)
  • ऑगस्ट २०२५ : सरासरी २२० मि.मी., प्रत्यक्ष पाऊस १७७.८ मि.मी. (८०.८%)
  • जूनपासून आजपर्यंत एकूण ७४५.२ मि.मी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ८६.५ टक्के आहे.

सद्यस्थिती
सध्या पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिले आहेत.

Web Title: Water released from 17 dams after heavy rains in pune district rain news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Monsoon Alert
  • pune news
  • Rain News

संबंधित बातम्या

बीडमध्ये सुटकेचा थरार! ‘या’ तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचं रेस्क्यू
1

बीडमध्ये सुटकेचा थरार! ‘या’ तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचं रेस्क्यू

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा प्रताप….; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडलं कुत्रं, पुण्यात गुन्हा दाखल
2

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा प्रताप….; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडलं कुत्रं, पुण्यात गुन्हा दाखल

India Rain Alert: परतीच्या पावसाचा देशभरात अक्षरशः धुमाकूळ; पुढचे काही तास…; IMD चा इशारा काय?
3

India Rain Alert: परतीच्या पावसाचा देशभरात अक्षरशः धुमाकूळ; पुढचे काही तास…; IMD चा इशारा काय?

Anurag Thakur : अनुराग ठाकूर यांची राहुल गांधींवर टीका, म्हणाले; गरज असते तिथे…
4

Anurag Thakur : अनुराग ठाकूर यांची राहुल गांधींवर टीका, म्हणाले; गरज असते तिथे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.