अहिल्यानगर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. निमगाव वाघा येथील मुख्य तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. केंद्राच्या विशेष पथकाने चास परिसरासह निमगाव वाघा येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी केली. यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांनी पथकासमोर आपल्या व्यथा मांडत २०२६ मधील दुष्काळाची तीव्रता १९७२ च्या दुष्काळापेक्षाही अधिक असल्याची खंत व्यक्त केली. अहिल्यानगर तालुक्यातील चास आणि परिसर तसेच निमगाव वाघा येथे केंद्राच्या विशेष पथकाने दुष्काळपरिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी पथकासमोर मांडल्या