सोनई गावातील सराईत गुन्हेगार संजय वैरागर याच्याविरोधात तातडीने कारवाई करून विशेष तपास पथक (SIT) नेमावे, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक गणेश चव्हाण यांनी केली आहे. वैरागर याच्यावर खूनाचा प्रयत्न, खंडणी, हफ्तेखोरी, आणि पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो जामीन न घेता गावात मोकळेपणाने फिरत आहे, असा आरोप त्यांनी केला. गणेश चव्हाण यांनी सांगितले की, वैरागरने त्यांच्या दुकानावर खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आणि गुन्हा दाखल केल्याच्या रागातून त्यांच्यावर हल्ला केला. हे प्रकरण पूर्णपणे सूडभावनेतून केलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.