अकोला शहरातील लहान उमरी परिसरात घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग क्रमांक ३ आणि प्रभाग क्रमांक ५ यांच्यातील वाद आता उघडपणे समोर आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ५ मधील काही नागरिकांकडून प्रभाग क्रमांक ३ मधील मुख्य मार्गावर, वीर भगतसिंग यांच्या पुतळ्याजवळ वारंवार घनकचरा टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक हरीश काळे यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित प्रकारावर आक्षेप घेतला होता. दरम्यान, आज या वादाला आणखी वेगळे वळण मिळाले. नगरसेवक हरीश काळे यांनी कथित निषेध म्हणून प्रभाग क्रमांक ५ मधील वीर भगतसिंग पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात घनकचरा आणून टाकल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.विशेष म्हणजे, स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर कचरा टाकण्यात आल्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ अशा प्रकारे घनकचरा टाकणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, राजकीय वादाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणे आणि महापुरुषांच्या स्मारकांचा वापर करणे चुकीचे असून यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. तसेच या प्रकारामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.